Navpancham Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करतात आणि राजयोग तसेच नवपंचम योग निर्माण करतात ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. आता तब्बल ५५९ वर्षानंतर नवपंचम योग निर्माण होत आहे ज्यामध्ये गुरू-केतु, मंगळ-शनि, मंगळ -शुक्र , बुध -गुरू, चंद्र आणि राहु मिळून ७ नवपंचम योग निर्माण होत आहे. ज्यामुळे काही राशींचा गोल्डन वेळ सुरू होणार आहे. तसेच काही राशींना आकस्मिक धनलाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या त्या लकी राशी कोणत्या आहेत.

मेष राशी (Aries Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी ७ नवपंचम राजयोग लाभदायक ठरू शकतो. कारण या राशीचा स्वामी ग्रह मंगळ मेष राशीच्या गोचर कुंडलीमध्ये तिसऱ्या भावात गोचर करत आहे. तसेच शनि आणि शुक्राबरोबर नवपंचम राजयोग निर्माण होत आहे. त्यामुळे या वेळी या लोकांना आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणूकीतून फायदा मिळू शकतो. नवीन योजनांमध्ये धन संपत्तीची गुंतवणूक करू शकता. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. संपत्ती खरेदी करू शकतात. पण या दरम्यान या लोकांना रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कर्क राशी (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी ७ नवपंचम योग निर्माण होणे फायदेशीर ठरू शकते. या दरम्यान या लोकांच्या पगारात जबरदस्त वाढ होऊ शकते. तसेच समाजात हे लोक अतिशय लोकप्रिय होतील. या लोकांच्या मान सन्मानात आणि प्रतिष्ठेत वाढ होईन. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्याची संधी मिळेन. कमाईचे स्त्रोत वाढतील. शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास लाभ मिळतील. तसेच या काळात आरोग्यामध्ये सुधारणा येऊ शकते. या लोकांनी ठरवलेली कामे पूर्ण होतील.

मकर राशी (Makar Zodiac)

सात नवपंचम योग निर्माण झाल्यामुळे मकर राशीच्या लोकांना शुभ फळ मिळतील. या दरम्या या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात शुभ वार्ता ऐकायला मिळतील. तसेच जुन्या गुंतवणूकीतून या लोकांना लाभ मिळेन. नवीन योजनांमध्ये धनलाभ होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण राहीन. हे लोक संपत्ती खरेदी करण्याचा विचार करू शकतात आणि नवीन ठिकाणी धन संपत्ती गुंतवू शकतात. या दरम्यान हे लोक लक्झरी गोष्टी खरेदी करू शकतात. या दरम्यान हे लोक काम व्यवसायाशी संबंधित प्रवास करू शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader