Shadashtak Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका ठराविक कालावधीनंतर गोचर करून अशुभ योग निर्माण करतात ज्याचा व्यापक प्रभाव मानवी जीवनासह पृथ्वीवर दिसून येतो. भूमि पुत्र मंगळ आता या वेळी कर्क राशीमध्ये स्थित आहे आणि ७ जून पर्यंत येथेच राहणार. त्यानंतर ते या राशीतून बाहेर पडून सिंह राशीमध्ये गोचर करणार आहे.
मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये आल्यानंतर मीन राशीमध्ये विराजमान असलेल्या शनिबरोबर अशुभ षडाष्टक योग निर्माण करेन ज्यामुळे काही राशींनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. या राशींची धन हानी किंवा आरोग्य खराब होण्याचे योग दिसून येत आहे. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत.

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)

या लोकांसाठी षडाष्टक योग निर्माण होणे हानिकारक ठरू शकते. या वेळी या लोकांना कोणत्याही प्रकारचा तणाव येऊ शकतो. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे निष्काळजीपणा करू नये. या लोकांनी या दरम्यान आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यामुळे विवाहित लोकांसाठी वैवाहिक आयुष्य तणावाने भरलेले दिसून येईल.

कुंभ राशी (Kumbh Zodiac)

षडाष्टक योग निर्माण झाल्याने कुंभ राशीच्या लोकांचे नुकसान होऊ शकते. यावेळी या लोकांचे आरोग्य खराब राहू शकते. तसेच या वेळी कोणालाही पैसे उधार देऊ नये, अन्यथा नुकसान होऊ शकते. या दरम्यान नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच या वेळी व्यावसायिकांची कमाई कमी राहीन. या लोकांनी अनावश्यक पैसे खर्च करणे टाळावे.

कन्या राशी (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग निर्माण होणे नुकसानदायक ठरू शकते. या वेळी या लोकांना मानसिक तणाव येऊ शकतो. तसेच जोडीदाराला घेऊन तणाव येऊ शकतो. त्यामुळे वादविवादापासून स्वत:ला दूर ठेवणे गरजेचे आहे.

या दरम्यान या लोकांनी वाहने सतर्कतेने चालवावी अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. या वेळी नोकरी करणाऱ्या लोकांना ज्युनियर आणि सिनिअरबरोबर कोणत्या विषयावरून मतभेद होऊ शकतो. या दरम्यान व्यावसायिकांचे धन अडकू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)