Shadashtak Yoga: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या चालीला खूप महत्वपूर्ण मानले जाते. कारण, याचा सरळ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. सध्या कर्मफळदाता शनी कुंभ राशीमध्ये विराजमान असून छाया ग्रह केतू कन्या राशीत विराजमान आहे. त्यामुळे यावेळी या दोन्ही ग्रहांची स्थिती खास संयोग निर्माण करत आहे, ज्याला शनी-केतूचा ‘षडाष्टक योग’ म्हटले जाते. हा योग व्यक्तीच्या अडचणींमध्ये मार्ग शोधण्यास त्याची मदत करतो. परंतु या योगाचा १२ राशींपैकी काही राशींवरच अशुभ प्रभाव पाहायला मिळेल, तर काही राशींना मात्र या योगाने अनेक फायदे होतील. या काळात त्या राशीच्या व्यक्तींना धन-संपत्तीसह, यश मिळण्याचे संकेत आहेत.
शनी-केतूचा ‘षडाष्टक योग’ तीन राशींसाठी लाभदायी
मेष
मेष राशीच्या व्यक्तींसाठी ‘षडाष्टक योग’ अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात आयुष्यात अनेक अडचणींमधून तुम्ही मुक्त व्हाल. नव्या गोष्टी करण्याची संधी मिळेल. अचानक धनलाभ होईल, आत्मविश्वासात वाढ होईल. रहस्यमय आणि आध्यात्मिक विषयांबद्दल मनात आकर्षण निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत मिळेल. मानसिक शांती लाभेल. स्पर्धा परिक्षेत उत्तम यश मिळवाल.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील ‘षडाष्टक योग’ खूप लाभदायी सिद्ध होईल. नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना या काळात खूप यश मिळेल. या काळात तुमच्या धन-संपत्तीत आणि मान-सन्मानात वाढ होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळेल. आर्थिक समस्या दूर होतील. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील.
मकर
मकर राशीच्या व्यक्तींनाही ‘षडाष्टक योग’ खूप सकारात्मक सिद्ध होईल. या काळात अडकलेली कामे पुर्ण होतील. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. या काळात तुम्हाला मानसिक शांतीदेखील मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)