Shadashtak Yog Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, वर्ष २०२५ ची सुरुवात ग्रह गोचरमुळे अत्यंत खास असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला सूर्य आणि गुरूमुळे षडाष्टक योग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ३ जानेवारी २०२५ रोजी सूर्य आणि गुरू एक दुसर्यांपासून १५० डिग्रीवर विराजमान असतील ज्यामुळे षडाष्टक दृष्टी योग निर्माण होईल. २०२५ च्या सुरुवातीला सूर्य गुरू मुळे निर्माण होणारा हा योग ३ राशींसाठी खास असणार आहे. जाणून घेऊ या वर्षाच्या सुरुवातील सूर्य गुरूच्या युतीमुळे निर्माण होणारा षडाष्टक दृष्टी योग कोणत्या राशींसाठी खास असणार आहे. (Shadashtak Yog Astrology three zodiac signs get money and wealth by Surya and gurus grace)
सिंह राशी (Singh Rashi)
सूर्य गुरूपासून निर्माण होणारा षडाष्टक योग सिंह राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. धन संपत्तीमध्ये सुधारणा दिसून येईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वडीलांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास दिसून येईल. कोणताही मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसून येत आहे. मित्रांच्या सहकार्याने चांगली नोकरी प्राप्त होऊ शकते.
धनु राशी (Dhanu Rashi)
वर्ष २०२५ च्या सुरुवातील गुरू सूर्याचा षडाष्टक योग धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक मानला जाईल. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात वडिलांचे सहकार्य लाभू शकते व्यवसायात मोठी योजना कामी येऊ शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा उत्तम होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. प्रमोशनची शक्यता आहे.
मीन राशी (Meen Rashi)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षातील पहिला आठवडा अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. सूर्याच्या प्रभावामुळे नोकरीशी संबंधित शुभ बातमी मिळू शकते. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती उत्तम राहीन. कामाच्या ठिकाणी बदल जाणवू शकतो. नोकरीमध्ये स्थान परिवर्तनाचा योग निर्माण होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहीन. व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल. धन संपत्तीमध्ये चांगली प्रगती होईल. मानसिक आरोग्य उत्तम राहीन.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)