Budha-Mangal Shadashtak Yog 2025: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. बुध वाणी, बुद्धि आणि व्यापाराचा कारक ग्रह आहे. तर मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. तो साहस, पराक्रम आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह आहे. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीतील बदल प्रत्येक राशीवर चांगला किंवा वाईट प्रकार पडतो. दरम्यान, बुध आणि मंगळ ८ जानेवारी (आज) सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी एकमेकांपासून १५० डिग्रीवर असतील. ज्यामुळे षडाष्टक राजयोग निर्माण होईल. या षडाष्टक राजयोगाच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींवर त्याचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

षडाष्टक राजयोग तीन राशींसाठी शुभ

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींना षडाष्टक योगाचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही नेहमी सकारात्मक विचार कराल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवाल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी षडाष्टक योग खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

हेही वाचा: पुढील ७८ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशी कमावणार पैसा आणि प्रतिष्ठा

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींना षडाष्टक योगाचे खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, या काळात मकर राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shadashtak yoga will create mercury mars from today people of these three zodiac signs will earn a lot of money sap