Shadashtak Yoga: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह अन्य कोणाशीही भ्रमण किंवा योग करतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. ज्योतिषशास्त्रनुसार शनि आणि मंगळ अशुभ षडाष्टक योग तयार करणार आहेत. ज्योतिषशास्त्रात शनि आणि मंगळ या दोन्ही ग्रहांमध्ये शत्रुत्वाची भावना आहे. त्यामुळे सर्व राशींवर या योगाचा प्रभाव राहील. पण अशा ४ राशी आहेत, ज्यांनी यावेळी खूप काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

मिथुन राशी

षडाष्टक योग तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे यावेळी पैसे गुंतवणे टाळावे. त्याच वेळी, आपल्या जोडीदाराशी संबंधांमध्ये कटुता येऊ शकते. तसेच, यावेळी तुम्ही व्यवसायात कोणत्याही नवीन कराराला अंतिम रूप देणे टाळावे. कारण यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. यावेळी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू नयेत. यावेळी वाहन जपून चालवावे. कारण अपघात होण्याची शक्यता असते.

Shani Margi 2024 shani gochar 2024 adtrology in marathi
Shani Margi : दिवाळीनंतर शनीदेव ‘या’ राशींच्या लोकांना करणार करोडपती? नोकरी, व्यवसायात मिळू शकतो बक्कळ पैसा अन् यश
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
astronomers research regarding future earth and how it will be after 800 million
विश्लेषण : ‘भविष्यातील पृथ्वी’बाबतचे खगोलतज्ज्ञांचे संशोधन काय? आठशे कोटी वर्षांनंतर पृथ्वी कशी असेल?
upsc preparation marathi news
UPSC ची तयारी: अर्थशास्त्र विषयाची तोंडओळख
Risk of Heart Attack During Angiography
अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Dermatologists approached high court to stop dentists from performing skin related surgeries
सौंदर्याशी संबंधित शस्त्रक्रियांवरून दंतरोग तज्ज्ञ आणि त्वचा रोग तज्ज्ञांमध्ये का जुंपली? हा मुद्दा वादाचा का ठरतोय?
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?

( हे ही वाचा: २०२२ च्या अखेरीस ‘या’ राशींच्या कुंडलीत तयार होतोय ‘राजयोग’; शुक्राच्या कृपाने मिळू शकतो भरपूर पैसा)

मकर राशी

षडाष्टक योग तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकतो. यावेळी पार्टनरशिपच्या कामात तुमचे नुकसान होऊ शकते. तसेच, जर तुम्हाला पार्टनरशिपचे काम सुरू करायचे असेल तर यावेळी थांबवा. अन्यथा नुकसान होऊ शकते. यावेळी तुम्हाला मित्रांसोबतही सावध राहण्याची गरज आहे. तसेच पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. गॅस, बद्धकोष्ठता यासंबंधी काही समस्या असू शकतात. दुखापत आणि अपघात होण्याची शक्यता आहे.

कर्क राशी

कर्क राशीच्या राशीच्या लोकांनी हा अशुभ योग तयार झाल्यामुळे सावध राहावे. कारण मंगळ तुमच्या पारगमन कुंडलीच्या १२व्या घरात स्थित आहे , जो ज्योतिषशास्त्रात अत्यंत धोकादायक मानला जातो. त्याचवेळी मंगळाची नजर तुमच्या लग्नस्थानावर आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे.

( हे ही वाचा: १८ ते २६ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड पैसा; बुध आणि शुक्राच्या युतीमुळे उजळणार भाग्य)

वृश्चिक राशी

तुमच्या राशीचा स्वामी मंगळ संक्रमण कुंडलीत मृत्यू स्थानात विराजमान आहे. तर दुसरीकडे शनिदेव तिसऱ्या घरात आहेत. त्यामुळे षडाष्टक तुम्हा लोकांना त्रासदायक ठरू शकते. यावेळी तुमचा अपघात होण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा. तसेच, सध्या कोणालाही पैसे देणे टाळा. अन्यथा पैसे बुडू शकतात. यावेळी व्यापाऱ्यांनीही काळजी घ्यावी. नवीन गुंतवणूक टाळावी.