7 January Rashi Bhavishya In Marathi : ७ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी मंगळवारी संध्याकाळी ४ वाजून २७ मिनिटांपर्यंत राहील. तर आज ११ वाजून १६ मिनिटांपर्यंत शिवयोग जुळून येईल. शिव म्हणजे शुभ. त्यामुळे अनेक कामांना आज यश मिळेल. तसेच रेवती नक्षत्र मंगळवारी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांपर्यंत जागृत असेल. राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

त्याचप्रमाणे आज शाकंभरी नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होत असून ७ जानेवारी २०२५ रोजी पहाटे मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना होऊन ब्राह्मणास अनुष्ठानाची वर्णी देण्यात येईल. तर आज शाकंभरी देवी कोणाच्या आयुष्यात सुख, शांती, वैभव घेऊन येणार हे आपण जाणून घेऊया…

11 February 2025 Horoscope In Marathi
११ फेब्रुवारी राशिभविष्य: पुष्य नक्षत्रात माघ पौर्णिमा आल्याने ‘या’ ४ राशींना मिळणार भरपूर सुख; तुमची रास असेल का भाग्यवान?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Valentines Day 2025 Horoscope
‘व्हॅलेंटाईन डे’ला काही लोकांना भेटणार कोणीतरी खास तर काहींच्या आयुष्यात फुलणार प्रेम, जाणून घ्या कोणत्या आहेत ‘या’ लकी राशी
7 February 2025 Mesh To Meen Horoscope
७ फेब्रुवारी राशिभविष्य: इंद्र योगात कर्क, कन्यासह ‘या’ राशींचे बदलणार नशीब? कामात मिळेल भरपूर यश; वाचा तुमचा कसा असेल दिवस
saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
Mesh To Meen Zodiac signs Daily Horoscope In Marathi
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
2nd February 2025 Rashi Bhavishya
२ फेब्रुवारी पंचांग: सरस्वतीच्या कृपेने कोणाच्या घरात येईल यश आणि प्रसिद्धी? रविवारी तुमच्या राशीची होणार का इच्छापूर्ती?

७ जानेवारी पंचांग व राशिभविष्य (7 January 2025 Horoscope) :

मेष:- कुटुंबातील सदस्यांची मदत होईल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल.

वृषभ:- आज कामाच्या ठिकाणी सक्रिय राहाल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. दिवस हसत-खेळत जाईल. मित्रांची ऐनवेळी मदत मिळेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.

मिथुन:- आपल्या मनाचा आवाज ओळखावा. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. योग साधनेला अधिक प्राधान्य द्यावे. कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो. व्यावसायिक लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी.

कर्क:- मानसिक तोल सांभाळावा. अति खोलात जाऊ नका. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

सिंह:- व्यावसायिक लोकांनी सावधपणे वागावे. कोणावरही विसंबून राहू नका. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. जोडीदाराची प्रगती खुश करणारी असेल. लहान व्यवसायिकांना लाभदायक दिवस.

कन्या:- आज जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. इतरांचा सल्ला फार मनावर घेऊ नका. फसवणुकीपासून सावध राहावे.

तूळ:- तुमचे ज्ञान कामी येईल. संयम व विवेकाने वागावे. प्रेमी जीवनाला बहर येईल. सहकार्‍यांची मोलाची साथ लाभेल. सामाजिक स्तरावर अनपेक्षित लाभ मिळतील.

वृश्चिक:- घरात अधिक वेळ घालवाल. छान मनमोकळ्या गप्पा होतील. जुने प्रयत्न फळाला येतील. वाहन खरेदीची इच्छा प्रकट कराल. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

धनू:- तुमच्यातील सहनशीलता वाढीस लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. शांततेने इतरांची मते जाणून घ्या. कामाचा वेग वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.

मकर:- गोडीने सर्वांना जिंकून घ्याल. कौटुंबिक प्रगती साधता येईल. आवडते पदार्थ बनवाल. व्यापार्‍यांना अपेक्षित लाभ मिळेल. कौटुंबिक चर्चा सकारात्मक असेल.

कुंभ:- जोडीदार तुमच्यावर खुश होईल. तुमचे हट्ट पुरवले जातील. दिवस मनाजोगा घालवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका.

मीन:- परदेशी कंपनीकडून बोलावणे येईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. तज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा. मानसिक व्यग्रता जाणवेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader