7 January Rashi Bhavishya In Marathi : ७ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी मंगळवारी संध्याकाळी ४ वाजून २७ मिनिटांपर्यंत राहील. तर आज ११ वाजून १६ मिनिटांपर्यंत शिवयोग जुळून येईल. शिव म्हणजे शुभ. त्यामुळे अनेक कामांना आज यश मिळेल. तसेच रेवती नक्षत्र मंगळवारी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांपर्यंत जागृत असेल. राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
त्याचप्रमाणे आज शाकंभरी नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होत असून ७ जानेवारी २०२५ रोजी पहाटे मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना होऊन ब्राह्मणास अनुष्ठानाची वर्णी देण्यात येईल. तर आज शाकंभरी देवी कोणाच्या आयुष्यात सुख, शांती, वैभव घेऊन येणार हे आपण जाणून घेऊया…
७ जानेवारी पंचांग व राशिभविष्य (7 January 2025 Horoscope) :
मेष:- कुटुंबातील सदस्यांची मदत होईल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल.
वृषभ:- आज कामाच्या ठिकाणी सक्रिय राहाल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. दिवस हसत-खेळत जाईल. मित्रांची ऐनवेळी मदत मिळेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.
मिथुन:- आपल्या मनाचा आवाज ओळखावा. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. योग साधनेला अधिक प्राधान्य द्यावे. कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो. व्यावसायिक लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी.
कर्क:- मानसिक तोल सांभाळावा. अति खोलात जाऊ नका. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
सिंह:- व्यावसायिक लोकांनी सावधपणे वागावे. कोणावरही विसंबून राहू नका. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. जोडीदाराची प्रगती खुश करणारी असेल. लहान व्यवसायिकांना लाभदायक दिवस.
कन्या:- आज जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. इतरांचा सल्ला फार मनावर घेऊ नका. फसवणुकीपासून सावध राहावे.
तूळ:- तुमचे ज्ञान कामी येईल. संयम व विवेकाने वागावे. प्रेमी जीवनाला बहर येईल. सहकार्यांची मोलाची साथ लाभेल. सामाजिक स्तरावर अनपेक्षित लाभ मिळतील.
वृश्चिक:- घरात अधिक वेळ घालवाल. छान मनमोकळ्या गप्पा होतील. जुने प्रयत्न फळाला येतील. वाहन खरेदीची इच्छा प्रकट कराल. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.
धनू:- तुमच्यातील सहनशीलता वाढीस लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. शांततेने इतरांची मते जाणून घ्या. कामाचा वेग वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.
मकर:- गोडीने सर्वांना जिंकून घ्याल. कौटुंबिक प्रगती साधता येईल. आवडते पदार्थ बनवाल. व्यापार्यांना अपेक्षित लाभ मिळेल. कौटुंबिक चर्चा सकारात्मक असेल.
कुंभ:- जोडीदार तुमच्यावर खुश होईल. तुमचे हट्ट पुरवले जातील. दिवस मनाजोगा घालवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका.
मीन:- परदेशी कंपनीकडून बोलावणे येईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. तज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा. मानसिक व्यग्रता जाणवेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर