Shravan Amavasya 2022: श्रावण महिन्याची अमावस्या तिथी खूप खास आहे. कारण या महिन्यात ही अमावस्या शनिवारी येत आहे. त्यामुळे ही अमावस्या शनिश्चरी अमावस्या म्हणून ओळखली जाईल. या अमावस्येला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात. शनी अमावस्येच्या दिवशी शनिवार असल्याने शनिदोष, शनीची साडेसाती पासून सुटका होऊ शकते. तर जाणून घ्या श्रावण अमावस्येची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व…
शनी अमावस्या तिथी आणि शुभ मुहूर्त
श्रावण महिन्याची अमावस्या तिथी सुरू होते – २६ ऑगस्ट, शुक्रवार दुपारी १२.२३ वाजता
श्रावण महिन्याची अमावस्या समाप्त – २७ ऑगस्ट, शनिवारी दुपारी १.४६ मिनिटांपर्यंत
तिथी- अमावस्या तिथीचा सूर्योदय २७ ऑगस्टला होईल. त्यामुळे हा दिवस ही तिथी मानला जाईल.
अभिजीत मुहूर्त: सकाळी ११.५७ ते दुपारी १२.४८ पर्यंत
( हे ही वाचा: १ वर्षानंतर बुधाने केला त्याच्या मूळ त्रिकोण कन्या राशीत प्रवेश; ‘या’ ३ राशींना प्रगतीसोबत होईल भरपूर धनलाभ)
शनी अमावस्येला शुभ योग बनत आहे
शनी अमावस्येच्या दिवशी शिव आणि सिद्ध योगही तयार होत आहेत. जिथे २७ ऑगस्ट रोजी पहाटे २.११ पासून शिवयोग सुरू होईल आणि २८ ऑगस्ट रोजी पहाटे २.६ पर्यंत राहील. त्याचबरोबर २८ ऑगस्टला पहाटे २.०७ पासून सिद्ध योग सुरू होत आहे.
श्रावण अमावस्येचे महत्त्व
श्रावण अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते. कारण हा दिवस शनिवार आहे. अशा परिस्थितीत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. यासोबतच या दिवशी पितरांची पूजा देखील करण्यात येते. श्रावण अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)