Shani and Guru Position on Holi 2023: फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. २०२३ च्या होळीच्या दिवशी ग्रहांनी अद्भुत योगायोग साधला आहे. यंदा होळीच्या दिवशी गुरु व शनिदेव हे स्वराशीत स्थित आहेत. वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार अशी ग्रहदशा ही तब्बल ३० वर्षांनी जुळून आली आहे. यंदा ३० वर्षांनी शनिदेव कुंभ राशीत तर १२ वर्षांनी गुरुदेव मीन राशीत स्थित आहेत. याशिवाय कुंभ राशीत बुध- शनी सूर्याने त्रिगही योग साकारलेला आहे. या एकूण स्थितीनुसार मार्च महिन्यात काही राशींच्या भाग्योदयाचे योग आहेत. होळीपासून कोणत्या राशींना धनलाभासह प्रगतीची संधी लाभणार आहे हे जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

होळी २०२३ कधी आहे (Holi 2023 Dates)

उदयतिथीनुसार होळी दहन 6 मार्च 2023 असणार आहे. पंचागनुसार संध्याकाळी 6.24 ते रात्री 8.51 पर्यंत होळी दहनाचा मुहूर्त आहे.

होळीपासून ‘या’ राशीच्या भाग्याला कलाटणी? (Holi Lucky Zodiac Signs)

सिंह (Leo Zodiac)

२०२३ ची होळी तुम्हाला चांगल्या मार्गांनी पैसा देऊ शकते. होळीमुळे तुमचे प्रेमजीवन पुन्हा रुळावर येऊ शकते. मात्र, या काळात तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात खूप मेहनत करावी लागणार आहे.

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीसाठी होळी चांगली राहील तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राहू शकतो. व्यावसायिक जीवणात तुम्हाला हवे ते मिळू शकते आणि तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी ही होळी व्यावसायिकदृष्ट्या उत्तम असण्याची शक्यता कमी आहे. तुम्हाला वाडवडिलांच्या मालमत्तेमुळे आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.विद्यार्थी वर्गाला शनी, बुधाच्या मदतीने अभ्यासात विशेष प्रगती साधता येईल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील.

हे ही वाचा<< मार्च महिन्याचे ३१ दिवस ‘या’ राशींसाठी लकी ठरणार? कुणाला धनलाभ तर कुणाला शनी.. जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

वृषभ (Taurus Zodiac)

तुमच्या राशीत गुरुच्या प्रभावासह शुक्र युती करणार आहे, यामुळे होळीच्या आधीपासूनच आपल्याला धनलाभाची संधी मिळू शकते. ही युती आपल्या राशीच्या आर्थिक मिळकत व लाभ स्थानी तयार होत आहे. येत्या काळात गुणतवणुकीवर अधिकाधिक भर द्या. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani and guru trigahi yog on holi 2023 these zodiac signs will get huge money income love astrology for march horoscope svs