ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका निश्चित अंतराळात राशी परिवर्तन करतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवन आणि देश आणि जगावर पाहायला मिळतो. यावेळी होळीला असा योग बनणार आहे, जो तब्बल ३० वर्षांनंतर येणार आहे. शनि ३० वर्षांनंतर स्वराशी कुंभ आणि १२ वर्षानंतर देव गुरु बृहस्पती स्वराशी मीनमध्ये विराजमान होणार आहे. तसंच या दिवशी त्रिगही योगही बनणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर झाल्याचं पाहायला मिळेल. पण चार राशी अशा आहेत, ज्यांना या योगातून आकस्मिक धनलाभ आणि भाग्य उजळू शकतं. जाणून घेऊयात या नशिबवान राशी कोणत्या आहेत.
वृषभ राशी (Taurus Zodiac)
गुरु आणि शनिदेवाची युती तुम्हाला लाभ देऊ शकते. कारण गुरु ग्रह तुमच्या गोचर कुंडलीत इनकम स्थानात शनिदेव कर्म भावात गोचर करत आहेत. यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. तसंच बेरोजगार लोकांना अशा परिस्थितीत नवीन नोकरीही मिळू शकते. तसंच यावेळी तुम्हाला अनेक माध्यमातून धनप्राप्ती होऊ शकते. तर नोकरीवर असणार लोकांचा होळीनंतर प्रमोशन आणि इंक्रीमेंट होऊ शकतो. तसंच कार्यालयात तुम्हाला जूनियर आमि सीनियर लोकांचा साथ मिळू शकतो.
कुंभ राषी (Kumbh Zodiac)
शनी आणि गुरुदेवाचा संयोग कुंभ राशीच्या लोकांना लाभदायक ठरू शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीतून लग्नभाव आणि गुरु तुमच्या गोचर कुंडलीच्या १२ व्या भावात भ्रमण करणार आहेत. ज्यामुळे या कालावधीत तुम्हाला आत्मविश्वास वाढल्यासारखं वाटेल. तसंच तुमच्या पार्टनरसोबत चांगलं नात राहू शकतो. तसंच धनलाभही होऊ शकतो. तसंच शिक्षणात उत्तम प्रगती होण्याची शक्यता आहे. तसंच अविवाहीत लोकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो.
वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)
गुरु आणि शनिदेवाचा योग तुम्हाला यशप्राप्ती देऊ शकतो. कारण यावेळी शनिदेव तुमच्या राशीतून चतुर्थ भावातून गुरुपंचम भावातून भ्रमण करत आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती मिळू शकते. तसंच वाहन आणि संपत्तीची प्राप्तीही होऊ शकते. ज्या लोकांचा हॉटेल, प्रॉपर्टी आणि रियल इस्टेटचा व्यापार आहे, त्यांच्यासाठी ही वेळ लाभदायी ठरु शकते. तर या वेळी तुम्हाला संतान पक्षाकडून शुभ संकेत मिळू शकतात. तसंच या काळाता प्रेमसंबंधातही यश मिळू शकतं.
मिथुन राशी (Mithun Zodiac)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनि आणि गुरुची विशेष युती अनुकूल ठरु शकतो. कारण शनिदेव तुमच्या राशीतून शनिदेव नवम भाव तर गुरु ग्रह दशम भावात विचरण करत आहेत. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. तसंच तुम्ही या वेळेत काम-व्यापाराच्या निमित्ताने प्रवासही करु शकता. जो तुम्हाला लाभदायी ठरु शकतो. तसंच व्यापारांनाही या वेळेत धनलाभ होऊ शकतो. तसंच ज्या विद्यार्थ्यांना विदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती व गृहीतके यांच्यावर आधारित आहे)