Mangal Shani Yuti 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, दर महिन्याला काही ग्रह आपलं स्थान बदलतात आणि सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करतात. प्रत्येक ग्रहाचा भ्रमंती काळ वेगवेगळा असतो. त्याला ग्रह गोचर म्हणतात. एखाद्या राशीत एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे काही शुभ-अशुभ योग तयार होतात. आता येत्या नवीन वर्षात २०२४ मध्ये शनिदेव आणि मंगळदेवाची युती होणार आहे. ही युती जवळपास ३० वर्षांनी होणार आहे. शनिदेव नवीन वर्षात कुंभ राशीत विराजमान आहेत. त्यातच मंगळदेव कुंभ राशीत गोचर करणार आहेत. त्यामुळे दोन्ही ग्रहांचा संयोग काही राशींसाठी अतिशय शुभ ठरणार असून त्यांना जीवनात सुख, समृध्दी, अपार यश लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचं पालटणार नशीब, होणार धनलाभ?
वृषभ राशी
शनि आणि मंगळाची युती काही राशींसाठी फायदेशी ठरु शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. या वेळी नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अनपेक्षित नफा मिळू शकतो. तुम्हाला करिअरशी संबंधित उत्कृष्ट संधी मिळू शकतात. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. यावेळी तुम्ही कोणतेही वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. नवीन वर्षात तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.
(हे ही वाचा : जन्मापासूनच कन्यासह ‘या’ ३ राशींच्या मुली वडिलांसाठी भाग्यशाली सिद्ध होतात? लक्ष्मीच्या कृपेने श्रीमंती चालून येते दारी? )
मिथुन राशी
शनि आणि मंगळाची युती मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभकारी ठरु शकते. कारण ही युती तुमच्या राशीच्या नवव्या भावात तयार होत आहे. या राशीच्या लोकांना करिअर-आर्थिक स्थितीत मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. या काळात कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतात. समाजात मान सन्मान वाढू शकतो. या काळात चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी २०२४ पासून चांगला काळ सुरू होऊ शकतो. कारण, शनिदेव आणि मंगळदेवाची युती तुमच्या गोचर कुंडलीच्या लग्न भावात बनतेय. त्यामुळे भूतकाळात तुमचे झालेले आर्थिक नुकसान या काळात सुधारु शकते. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना पद, प्रतिष्ठा इत्यादी फायदे मिळू शकतात. एवढेच नाही तर या काळात केलेल्या कामात यश मिळू शकतो. तुमचे वैवाहिक जीवनही चांगले राहू शकते.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)