Kendra Tirkon Raj Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव संपूर्ण सृष्टीवर पाहायला मिळू शकतो. अभ्यासकांनी सांगितल्या प्रमाणे यंदा म्हणजेच २०२३ मध्ये शनि, गुरु, मंगळ सह अनेक ग्रह आपले स्थान बदलणार आहेत. २०२३ च्या जानेवारीपासून बुध ग्रह सुद्धा मोठ्या हालचाली करणार आहे. १२ जानेवारी बुध ग्रह मार्गी होऊन फेब्रुवारी च्या सुरुवातीला मकर राशीत स्थिर होणार आहे. मकर राशीत शनि व शुक्राचा प्रभाव असल्याने येथे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. याचा प्रभाव १२ राशींवर होणार असला तरी बुध ग्रहाच्या केंद्र त्रिकोण राजयोगाने ३ राशींचा भाग्योदय होणार आहे. येत्या काळात या ३ राशींना प्रचंड धनलाभासह श्रीमंत होण्याची संधी मिळू शकते.
केंद्र त्रिकोण राज योग म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रानुसार, केंद्र त्रिकोण राजयोग प्रथम, चौथा, सातवा, दहावा आणि त्रिकोण घर प्रथम, पाचवा आणि नववा या समीकरणाने तयार होतो. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. चला जाणून घेऊया की कोणत्या राशीच्या लोकांना हा योग तयार केल्याने सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
मकर (Capricorn Zodiac)
मकर राशीच्या मंडळींसाठी केंद्र त्रिकोण राजयोग हा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीच्या कुंडलीत लग्न भावात हा राजयोग तयार होत आहे. यामुळे येत्या काळात आपल्याला नव्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. आपल्या मानसिक तणावातून मुक्त झाल्याने आपल्याला मोकळेपणाने वावरता येईल. तसेच रखडून पडलेले काम सुद्धा मार्गी लागू शकते. येत्या काळात बुध ग्रहाची योग्य दृष्टी आपल्या राशीच्या सप्तम स्थानी असल्याने विवाहाचे प्रस्ताव येण्याची सुद्धा शक्यता आहे. या काळात जोडीदाराची साथ लाभून धनलाभ होऊ शकतो.
तूळ राशि (Tula Zodiac)
केंद्र त्रिकोण राजयोग तुळ राशीत तयार होत आहे. बुध ग्रह आपल्या राशीच्या चौथ्या भावात स्थिर होत असल्याने तूळ राशीला येत्याकाळात भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. आपल्याला वाहन व प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत. येत्या काळात जर आपण चैनीच्या वस्तू खरेदी करू इच्छित असाल तर आपल्याला निश्चितच अशा संधी मिळू शकतात. आपल्या जुन्या प्रॉपर्टीमधून धनलाभ होऊ शकतो. या काळात आपल्या आईसह संबंध सुधारण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा<< २० दिवसांनी ‘या’ ३ राशींना प्रचंड धनलाभ व श्रीमंतीची संधी; शनिदेव व शुक्र एकत्र देणार नशीबाला कलाटणी?
मेष (Aries Zodiac)
केंद्र त्रिकोण राजयोग असल्याने मेष राशीला करिअर व व्यवसायात शुभ लाभ होऊ शकतो. हा योग आपल्या राशीच्या दहाव्या स्थानावर तयार होत आहे. येत्या काळात नव्या नोकरीच्या संधीने आपल्याला प्रचंड धनलाभ होऊ शकतो. आपल्याला कामाच्या ठिकाणी पद- प्रतिष्ठा, मान- सन्मान तसेच बोनस रुपी धनलाभ मिळू शकतो. तुमच्या कामाच्या पद्धतीत सुधार होऊ शकतो यामुळे तुमचं खूप कौतुक होऊ शकतं व यातूनच धनलाभाच्या संधी आहेत.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)