Shani And Rahu Nakshatra Parivartan : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एक ग्रह निश्चित अंतराने राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा थेट परिणाम लोकांवर दिसून येतो. ३ ऑक्टोबर दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश केला आहे ज्या ठिकाणी राहु आधीच विराजमान आहे. राहु आणि शनिचा हा संयोग शतभिषा नक्षत्रामध्ये ५० वर्षानंतर निर्माण होत आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या राशींना आकस्मिक धन लाभ होऊ शकते आणि भाग्योदय होऊ शकतो. जाणून घेऊ या या राशी कोणत्या आहेत. (Shani And Rahu Nakshatra Parivartan After 50 years)
मकर राशी (Makar Zodiac)
मकर राशीच्या लोकांसाठी राहु आणि शनि शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश लाभदायक ठरू शकते. कारण शनि या राशीच्या धन स्थानावर आहे. तसेच राहु ग्रह तिसर्या स्थानावर आहे. त्यामुळे वेळोवेळी या लोकांना आकस्मिक धन लाभ होऊ शकतो. या लोकांचे धाडस वाढेन. या लोकांना अडकलेले धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. विदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफा मिळू शकतो. भाऊ बहिणीचे सहकार्य लाभेल.
तुळ राशी (Tula Zodiac)
राहु आणि शनि देव शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. कारण शनि देव या राशीच्या पाचव्या स्थानावर आहे तसेच राहु देव या राशीच्या सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना त्यांच्या अपत्यांकडून शुभ वार्ता मिळू शकते. या वेळी धन बचत करू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आनंदी राहतील. नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. या दरम्यान या लोकांना न्यायालयीन कामात यश मिळू शकते. प्रेम संबंधात या लोकांना यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात या लोकांना सुख शांती लाभेल. या दरम्यान पती पत्नी दरम्यान प्रेम वाढेल. नाते दृढ होतील.
मिथुन राशी (Mithun Zodiac)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनि आणि राहु देव शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणे लाभदायक ठरू शकते. कारण शनि देव या राशीच्या भाग्य स्थानावर आहे तसेच राहु देव कर्म भावावर विराजमान आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना नशीबाची साथ मिळू शकते. या लोकांना कामा संदर्भात प्रवास करण्याचा योग जुळून येईल. नोकरीच्या शोधात असणार्या लोकांना नोकरी मिळू शकते. तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला धन लाभ मिळू शकतो. व्यवसाय वाढू शकतो. या लोकांचे अर्धवट प्रोजेक्ट या वेळी सुरू होऊ शकतात पुढे याच प्रोजेक्टमध्ये या लोकांना लाभ मिळू शकतो. या लोकांच्या व्यावसायिक जीवनात बदल घडून येईल. या दरम्यान या लोकांना वडीलांचे सहकार्य निर्माण होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)