Samsaptak Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, वेळोवेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. ज्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो. वैदिक ज्योतिष शास्त्रातनुसार, शनि-शुक्र आणि गुरु-राहू समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे १८ ऑक्टोबरला तब्बल ९४ वर्षांनंतर ‘दुहेरी समसप्तक राजयोग’ तयार होणार आहे. हा राजयोग बनल्याने काही राशींना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ?
वृषभ राशी
‘दुहेरी समसप्तक राजयोग’ घडल्याने या राशींना चांगले दिवस अनुभवता येऊ शकतात. या राशीतील मंडळींना या काळात मेहनतीचं फळ मिळू शकतो. आर्थिक अडचणी दूर होऊन त्यांच्याकडे पैसा येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. आर्थिक लाभ झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : २०२४ पासून ‘या’ राशीतील लोकांचे सुखाचे दिवस सुरु? देवगुरुच्या कृपेने धनलाभ होऊन राजकारणी लोकांना मिळू शकतो पद )
तूळ राशी
तूळ राशीतील लोकांना ‘दुहेरी समसप्तक राजयोग’ बनल्याने शुभ परिणाम मिळू शकतात. या लोकांना अडकलेला पैसा मिळू शकतो. नवीन नोकरी मिळू शकते. या काळात घरात नवीन वाहन येण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत बळ येऊ शकतो. या काळात प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात. तर जोडीदाराच्या मदतीने आपल्याला चांगले फायदे मिळू शकतात. व्यवसायाशी निगडित लोकांना मोठा नफा मिळू शकतो.
धनु राशी
‘दुहेरी समसप्तक राजयोग’ धनु राशीतील मंडळीसाठी बंपर लाभ घेऊन येणारा ठरु शकतो. या राशीतील लोकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. बेरोजगारांना चांगली नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. या काळात कोणत्याही जुन्या शारीरिक समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)