Shani And Shukra Yuti: ज्योतिष शास्त्रानुसार एका ठराविक कालावधीनंतर ग्रह व नक्षत्र आपले स्थान सोडून राशी परिवर्तन करत असतात. ज्याचा प्रभाव संपूर्ण मानव प्रजातीवर पाहायला मिळू शकतो. येत्या मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तर दोन ग्रह एकाच वेळी एकाच राशीत आल्याने एक दुर्मिळ युती साधली जाणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार येत्या मकरसंक्रांतीला म्हणजेच १४ जानेवारीला शनिदेव व वैभवदाता शुक्र एकाच राशीत म्हणजेच मकर मध्ये एकत्र येणार आहेत. शनि व शुक्र यांच्या मैत्रीपूर्ण भाव असल्याने या युतीचा काही राशींना प्रचंड लाभ होऊ शकतो. केवळ प्रगतीच नव्हे तर धनलाभाच्या सुद्धा मोठ्या प्रबळ संधी आपल्याला लाभू शकतात.
शनि व शुक्र ‘या’ राशींना करतील श्रीमंत?
कन्या (Virgo Zodiac)
कन्या राशीसाठी शुक्र व शनिची युती अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. आपल्या राशीच्या सप्तम भावात शनि व शुक्राची युती तयात होत आहे. हे स्थान पार्टनरशिपचे व प्रेमाचे मानले जाते. यामुळे येत्या काळात आपल्याला प्रचंड प्रेम मिळणार असल्याचे संकेत आहेत. आपल्या जोडीदारासह तुमची नाती आणखी दृढ होऊ शकतात. जी मंडळी अविवाहित व विवाह इच्छुक आहेत त्यांना येत्या काळात लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून सर्वाधिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या मित्र व कुटुंबीय देत असलेला मान- सन्मान वाढू शकतो. या काळात तुम्हाला सुख व धनाच्या भागीदाराकडे लक्ष देण्याची गरज आहे.
हे ही वाचा<< मकरसंक्रांती पासून ‘या’ राशींचे भाग्य चमकणार? जानेवारी २०२३ मिळणार प्रचंड धनलाभाची संधी
तूळ (Tula Zodiac)
शनि व शुक्र जेव्हा एकत्र येतील तेव्हा तूळ राशीसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीच्या चतुर्थ भावात हे दोन ग्रह एकत्र येणार आहेत त्यामुळे आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. येत्या काळात धनलाभ होण्याचे पूर्ण संकेत आहेत. तसेच तुमच्या आर्थिक मिळकतीचे स्रोत सुद्धा वाढू शकतात. तुमच्याकडे असलेल्या संपत्तीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. आपल्याला येत्या काळात नवीन नोकरीची संधी येऊ शकते पण त्यापेक्षा तुमचा पूर्व जॉब तुम्हाला लाभदायक ठरू शकतो.
हे ही वाचा<< मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? यामागचे ‘हे’ कारण जाणून तुम्हीही पतंग उडवाल
मेष (Mesh Zodiac)
मंगळ ग्रहाची रास म्हणजेच मेष सुद्धा शनि- शुक्र राशीच्या युतीने समृद्ध होऊ शकते. या काळात बेरोजगारांसाठी अत्यंत लाभदायक काळ आहे. तुम्हाला नोकरीच्या महत्त्वाच्या संधी येऊ शकतात. हा येणारा काळ विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लाभदायक ठरू शकतो. तुम्हाला परदेश वारीचे संकेत आहेत. तुम्हाला व्यवसायातून नवनवीन मिळकतीचे स्रोत सापडू शकतात.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)