Surya Shani Yuti In Kumbh: १३ फेब्रुवारीला सूर्याने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. कुंभ राशीमध्ये शनि आणि सूर्य समोरासमोर असतील. १५ मार्चपर्यंत सूर्य कुंभ राशीत राहील. मेष राशीसह अनेक राशींसाठी सूर्य आणि शनिचा योग लाभदायक ठरेल. या दरम्यान ५ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीतील सूर्याचे भ्संक्रमण कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरेल.

मेष राशीवर सूर्याचा शुभ प्रभाव

कुंभ राशीतील सूर्याचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप लाभदायक ठरेल. हे संक्रमण तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या दरम्यान तुमचे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही सामाजिकदृष्ट्या अधिक सक्रिय व्हाल. यावेळी काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल.

Chanakya Niti in Marathi
शाहण्या व्यक्तीने गाढवाकडून शिकाव्या ‘या’ तीन गोष्टी! वाचा चाणक्य निती काय सांगते?
Mangal Kark Rashi Parivartan 2024
नुसता पैसा; मंगळाच्या जबरदस्त प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या…
Surya Shani Kendra Drishtisun and saturn 90 degree these zodiac sign will be shine
सूर्य आणि शनीची केंद्र दृष्टीमुळे ४ डिसेंबरपासून या राशींचे नशीब चमकणार! आयुष्यात आनंदी आनंद
vastu shastra Vastu tips for positive energy in home marathi
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे? बेडरुम, किचन ते मेन गेट नेमकं कोणत्या दिशेला असावे? जाणून घ्या वास्तू नियम
no alt text set
ग्रहांचा सेनापती मंगळ होणार वक्री, नववर्षाच्या सुरुवातीला या राशीच्या लोकांची होणार चांदीच चांदी, तुमची रास आहे का या?
23 November Rashi Bhavishya In Marathi
२३ नोव्हेंबर पंचांग: आज कोणाला मिळेल भाग्याची साथ तर कोणाची आर्थिक घडी सुधारणार? वाचा तुमचा शनिवार कसा जाणार
venus and saturn yuti 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ; शनी- शुक्राच्या संयोगाने नोकरी, व्यवसायात प्रगती अन् मिळणार बक्कळ पैसा!
Shani Transit 2024
१२७ दिवस शनीचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा

वृषभ राशीवर सूर्याचा शुभ प्रभाव

कुंभ राशीमध्ये, सूर्य तुमच्या राशीच्या १०व्या घरात प्रवेश करेल. जेव्हा सूर्य दशम भावात असतो तेव्हा तो खूप बलवान होतो. या काळात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगले नाव कमवू शकता. एवढेच नाही तर तुमचा पगारही चांगला वाढेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. सूर्य आणि शनीच्या योगामुळे तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असणार आहे, तुम्हाला फक्त या संधीचा फायदा घ्यावा लागेल. असे केल्याने तुम्हाला भविष्यासाठी उत्पन्नाचा स्रोत देखील मिळू शकतो.

मिथुन राशीवर सूर्याचा शुभ प्रभाव

कुंभ राशीतील सूर्याचे संक्रमण मिथुन राशीच्या नवव्या भावात असेल. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचा पुरेपूर फायदा मिळेल. या काळात समाजात तुमचे नाव चांगले राहील. तुम्हाला सर्वांकडून पूर्ण आदर मिळेल. या काळात तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाल. सूर्य आणि शनीच्या संयोगाने तुमच्या उत्पन्नातही वाढ होईल. यावेळी नशीब तुमच्या सोबत असेल, पण मेहनत करत राहा. प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी कराल.

सिंह राशीवर सूर्याचा शुभ प्रभाव

सूर्याचे संक्रमण तुमच्या राशीच्या सातव्या घरात कुंभ राशीत होईल. सूर्याचे हे संक्रमण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. या दरम्यान सूर्याची थेट दृष्टी तुमच्या राशीवर राहील. यावेळी तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप सक्रिय असाल. यावेळी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. या काळात जोडीदारासोबत तुमचा ताळमेळ चांगला राहील. या वेळी कोणताही नवीन व्यवसाय करार अंतिम केला जाऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल.

( हे ही वाचा: महाशिवरात्रीला ‘त्रिग्रही योग’ बनल्याने ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळू शकते भगवान महादेवाची साथ)

तुळ राशीवर सूर्याचा शुभ प्रभाव

तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्य अकराव्या भावात प्रवेश करेल. या संक्रमणामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी तुमच्याकडे उत्पन्नाचे अधिक स्रोत असतील. या काळात तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. नोकरी बदलू इच्छिणाऱ्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप उपयुक्त ठरेल. यासोबतच तुमचे आरोग्यही चांगले राहील.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)