Uranus and Saturn Labh Drishti Yog: ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता म्हटले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असतो अशा व्यक्तींना आयुष्यात अनेक सुख-सुविधा प्राप्त होतात. तसेच शनी अशुभ स्थितीत असल्यास व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तसेच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींवर शनीची नेहमी शुभ दृष्टी असते. नवग्रहांमध्ये शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. २९ मार्च २०२५ रोजी शनीने मीन राशीत प्रवेश केला असून २०२७ पर्यंत तो याच राशीत राहणार आहे. त्यामुळे अडीच वर्षाच्या काळात शनीची कोणत्याना कोणत्या ग्रहाबरोबर युती होईल किंवा त्याची दृष्टी एखाद्या ग्रहावर पडेल. ज्यामुळे शुभ-अशुभ राजयोग निर्माण होतील.

ज्योतिषशास्त्रानुसार, शनी ४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून २३ मिनिटांनी अरूण ग्रहापासून ६० डिग्रीवर असेल. ज्यामुळे त्रिकादश योग निर्माण होत आहे. ज्याचा प्रभाव १२ राशींवर विविध प्रकारे पाहायला मिळेल.

‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शनी आणि अरुण या ग्रहांनी निर्माण केलेला त्रिकादश योग खूप फायदेशीर असेल. या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील

धनु

हा योग धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. नव्या कामाची सुरुवात होईल. नवीन वस्तू खरेदी कराल. तुमच्यातील नेतृत्व क्षमता वाढेल. आनंदी वार्ता कानी पडतील. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल.

कुंभ

कुंभ राशीसाठी देखील हा योग अनेक बदल घडवून आणेल. या काळात मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. धार्मिक कार्यात यश मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)