Shani Asta 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव एका राशीत अडीच वर्षे राहतात. त्यानंतर ते दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. या कालावधीत मागच्या-पुढच्या राशींवर त्याचा प्रभाव पडत असतो. यालाच ज्योतिषशास्त्रात शनीची साडेसाती, असे म्हणतात. शनीची चतुर्थ आणि अष्टम स्थानावर नजर असते. त्यामुळे या राशींवर शनीचा प्रभाव दिसून येतो. त्यात शनिदेव आता स्वत:च्या कुंभ राशीत विराजमान होणार आहेत. म्हणजे सूर्याच्या प्रभावामुळे शनिदेव १९ दिवसांनंतर म्हणजे २४ जानेवारीपासून कुंभ राशीत अस्ताला जाणार आहेत. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी शनी कुंभ राशीत अस्ताला जाईल. शनीच्या अस्तामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो; तर काही राशींना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर २६ मार्च रोजी सकाळी ५ वाजून २० मिनिटांनी शनीचा कुंभ राशीत उगम होईल. पण, शनीच्या अस्तामुळे काही राशींना शारीरिक, मानसिक व आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊ शनीच्या अस्तामुळे कोणत्या राशींना काळजी घ्यावी लागेल ते…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष

मेष राशीच्या लोकांबद्दल बोलायचे, तर या राशीच्या लोकांना शनीच्या अस्तामुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत त्यांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्हाला पैसे मिळवण्यात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात अनेक प्रकारची आव्हाने उभी राहू शकतात; पण उशीर झाला तरी यश मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय कोणतेही काम करताना तुमचा आत्मविश्वास कमी पडू शकतो. तुम्ही तुमच्या कामात समाधानी नसाल. तसेच व्यवसायात काही समस्या उदभवू शकतात. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देताना दिसाल; ज्याचे संमिश्र परिणाम तुम्हाला जाणवू शकतील. त्याशिवाय तुमचे जोडीदाराबरोबर काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात.

वृषभ

कुंभ राशीमध्ये शनीच्या अस्तामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात अशांतता येऊ शकते. अशा परिस्थितीत नोकरीत चढ-उतार असू शकतात; तसेच नवीन संधीदेखील उपलब्ध होऊ शकतात; पण करिअरबाबत तुम्ही थोडे चिंतेत राहाल. सहकाऱ्यांबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर व्यवसायाबाबतही थोडे सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या व्यावसायिक स्पर्धकांमध्ये कठीण स्पर्धा होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी योग्य रणनीती बनवण्याची गरज भासू शकते. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात.

कन्या

शनीच्या अस्तामुळे कन्या राशीच्या लोकांनाही अनेक अडचणी येऊ शकतात. या राशीच्या लोकांनी नोकरी आणि व्यवसायात थोडे सावध राहणे आवश्यक आहे. तुमच्या मुलांच्या प्रगतीबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असाल. नोकरदारांना थोड्या कामासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. नोकरीत तुम्हाला थोडे दडपण जाणवेल. त्याचबरोबर जीवनात काही अडथळे येऊ शकतात. व्यवसायात नफा मिळणे कठीण होण्याची शक्यता आहे. संयमाने काम केले, तरच लाभ मिळू शकतो. कुटुंबात काही कारणावरून वाद होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani asta 2024 saturn sets in aquarius negative impact on these zodiac sign in marathi sjr