March Sankashti Chaturthi 2023: हिंदू धर्मात अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष महत्त्व आहे. भगवान श्रीगणेशाच्या भक्तांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात दोन संकष्टी चतुर्थी येतात. मार्च महिन्यात यंदा संकष्टी ही शनिदेवाच्या वाराला म्हणजेच ११ मार्च २०२३ ला आलेली आहे. शनिदेव व विघ्नहर्ता श्रीगणेशाच्या कृपाशीर्वादाने सर्वच राशींच्या भाग्यात लाभाचे योग तयार होत आहेत. ११ मार्चची संकष्टी ही भालचंद्र संकष्टी आहे. यादिवशी श्रीगणेशासह कुंभ राशीत उदयस्थितीत असणारा शनी सुद्धा भक्तांच्या कुंडलीत कृपादृष्टीचा वर्षाव करणार आहे. संकष्टी चतुर्थीची तिथी, शुभ मुहूर्त व चंद्रोदयाच्या वेळेसह आपण भाग्यवान राशी कोणत्या असतील हे सुद्धा पाहूया..
संकष्टी चतुर्थी भाग्यवान राशी (Sankashti Chaturthi Lucky Zodiac Signs)
कर्क (Cancer Zodiac)
व्यावसायिक लाभ होण्याचे योग आहेत. नवीन मित्र जोडले जातील. तुमच्यातील शालीनता भाग्याचे दार उघडू शकेल. जिथे जाल तिथे आनंद वाटाल. वाहन सौख्य लाभण्याची चिन्हे आहेत.
तूळ (Libra Zodiac)
शनीच्या कृपेने शेअर्सच्या व्यवसायातून लाभ संभवतो. व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून वागावे लागेल. कमी श्रमात कामे पार पडू शकतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास व प्रलोभनापासून दूर राहिल्यास लाभाची संधी आहे.
सिंह (Leo Zodiac)
कामाचा दर्जा सुधारण्यासाठी मोक्याची वेळ आहे. विद्यादाता श्रीगणेश आपल्याला कामाची दिशा दाखवून देऊ शकतात. घराची उत्कृष्ट सजावट करून मनाला प्रसन्नता देऊ शकता.
हे ही वाचा<< ५ एप्रिल २०२३ पर्यंत ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून चमकणार? मंगळ गोचर देणार प्रचंड धनलाभ व श्रीमंतीचा योग
भालचंद्र संकष्टी चतुर्थी तिथि व चंद्रोदय
भालचंद्र संकष्टी चतुर्थी प्रारंभ- १० मार्च २०२३; रात्री ९ वाजून ४२ मिनिट
भालचंद्र संकष्टी चतुर्थी समाप्त- ११ मार्च २०२३; रात्री १० वाजून ५ मिनिट
चंद्रोदयाची वेळ: १० वाजून ३ मिनिट
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)