Trigrahi Yog 2024: ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपले स्थान बदलत असतो. प्रत्येक ग्रहाच्या वेगानुसार त्याचा कोणत्याही राशीतील वास्तव्याचा कालावधी कमी जास्त होत असतो. विशेषतः शनीचा वेग हा अगदी कमी असल्याने अन्य ग्रहांच्या तुलनेत शनीला आपले स्थान बदलण्यासाठी अधिक वेळ लागतो, किमान अडीच तर जास्तीत जास्त साडेसात वर्षे शनी देव एखाद्या राशीत राहतात त्यामुळेच त्यांचा प्रभाव सुद्धा असाच मोजला जातो. मागील वर्षांपासून शनी महाराज कुंभ राशीत विराजमान आहेत. आता काही दिवसांनी याच कुंभ राशीत बुध आणि शुक्र प्रवेश करणार आहेत.
कर्मदाता शनीच्या कुंभ राशीत हे तीन ग्रह एकत्र आल्याने ज्योतिष शास्त्रातील शुभ राजयोग म्हणजे त्रिगही राजयोग निर्माण होणार आहे. शुक्र व शनीमधील नाते हे मित्रत्वाचे असल्याने या युतीचा अगदी सकारात्मक फायदा होऊ शकतो. तर बुध ग्रह हा बुद्धी सह धनसंपदेचा कारक मानला जात असल्याने त्याची या युतीमधील उपस्थिती प्रभावित राशींच्या नशिबाला कलाटणी देऊन जाऊ शकते. चला तर पाहुयात त्रिगही राजयोग निर्माण झाल्याने नेमक्या कोणत्या राशीला कसा लाभ होणे अपेक्षित आहे.
कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)
मूळ कुंभ राशीतच त्रिगही राजयोग निर्माण होत असल्याने आपल्या कुंडलीत प्रथम स्थानी या राजयोगाचा प्रभाव असणार आहे. लग्न भावात राजयोगाचा प्रभाव पाहता या कालावधीत तुम्ही आत्मविश्वासाने गोष्टी केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. रथसप्तमीपासून सूर्याचा प्रभाव असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वाला आत्मविश्वासाची जोड सुद्धा लाभू शकते. समाजातील मान- सन्मान वाढीस लागू शकतो.
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
त्रिग्रही योग वृषभ राशीसाठी सुद्धा लाभदायक सिद्ध होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या मंडळींना याचा विशेष फायदा होण्याची चिन्हे आहेत. या कालावधीत तुम्हाला लागणारे भांडवल व आर्थिक पाठबळ सहज उपलब्ध होण्यात मदत होऊ शकते. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. उलट उत्तरे देणे टाळावे. कौटुंबिक वादात मौन बाळगणे उत्तम ठरेल. तुम्हाला तुमच्या कर्मानुरूप धनलाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे कामात कंटाळा करू नये.
हे ही वाचा<< ३३१ दिवस ‘या’ राशींवर शनिदेव असणार मेहेरबान; कर्म बदलल्यास लाभेल अपार पैसा, बघा तुम्हाला आहे का ही संधी?
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
मिथुन राशीच्या मंडळींना त्रिगही योग बनल्याने नशिबाची साथ मिळू शकते. सुरु केलेले प्रत्येक काम पूर्णत्वाला नेऊ शकाल. तसेच त्या कामातून प्राचीन मोठे यश व धनलाभ सुद्धा प्राप्त करू शकणार आहात. गोष्टींकडे हिमतीने बघण्याची गरज आहे. स्वतःला कमी लेखणे टाळावे. गरज पडल्यास इतरांचा सल्ला आवर्जून घ्या पण अखेरीस स्वतःच्या मनाचा कौल सुद्धा ऐकायला हवा. रथसप्तमीनंतर आपल्या कुंडलीत सूर्याचा सुद्धा प्रभाव असल्याने ही युती होताच तुमचा गोल्डन पिरियड सुरु होऊ शकतो असे म्हणायला हरकत नाही.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)