Weekly Tarot Card Reading 1 to 7 May 2023 in Marathi: वैदिक ज्योतिषशात्रानुसार तुमच्या भविष्याबाबत अंदाज लावण्याचे विविध मार्ग असतात. प्रत्येक व्यक्तीच्या नावाच्या अक्षरावरून, मूळ अंकावरून, जन्मतारखेवरून तसेच कुंडलीवरून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांचे अंदाज वर्तवले जाऊ शकतात. अशीच ज्योतिषशास्त्राची एक शाखा म्हणजे टॅरो कार्ड्स. नव्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच १ मे ते ७ मे २०२३ दरम्यान १२ राशींच्या भाग्याचे काही अंदाज तज्ज्ञांनी वर्तवले आहेत. येत्या आठवड्याभरात मंगळ, बुध, शुक्र व सूर्य यांचे गोचर होणार आहे त्यामुळे याचा तुमच्या राशीवर नेमका काय प्रभाव पडू शकतो जाणून घेऊया..
मे महिन्याचा पहिला आठवडा तुमच्या राशीला कसा जाणार?
मेष रास (Aries Zodiac)
साप्ताहिक टॅरो कार्डनुसार येणाऱ्या आठवड्यात मेष राशीचं व्यक्तींना अचानक व अनपेक्षित धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे चालत राहा, भरकटू नका. कौटुंबिक सुखाने मन शांत असेल.
वृषभ रास (Taurus Zodiac)
साप्ताहिक टॅरो कार्डनुसार वृषभ राशीला येणाऱ्या आठवड्यात पोटाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे व तेलकट खाणे टाळावे, तुमच्या करिअरसाठी मात्र येणारा काळ अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो.
मिथुन रास (Gemini Zodiac)
साप्ताहिक टॅरो कार्डनुसार, मिथुन राशीचं मंडळींना नशिबाची साथ लाभू शकते. यामुळे तुमच्या करिअरच्या कक्षा रुंदावण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Zodiac)
साप्ताहिक टॅरो कार्डनुसार, कर्क राशीच्या मंडळींना या आठवड्यात दहा हत्तीचे बळ अनुभवता येऊ शकते. तुमच्या कामाचा वेग वाढू शकतो. सरकारी नोकरीच्या संधी तुमच्या आयुष्यात येणायचा काळ आहे.
सिंह रास (Leo Zodiac)
साप्ताहिक टॅरो कार्डनुसार, सिंह राशीला या आठवड्यात निराशा वाट्याला येऊ शकते. तुमच्या योजनेनुसार काम न झाल्याने तुमचे मनोबल दुबळे होऊ शकते. वाडवडिलांच्या संपत्तीवरून वादाची चिन्हे आहेत.
कन्या रास (Virgo Zodiac)
साप्ताहिक टॅरो कार्डनुसार, तुम्हाला येत्या आठवड्यात कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभू शकते. आयुष्यात नवा पाहुणा येण्याची शक्यता आहे. अध्यतमाशी जोडले जाऊ शकता.
तूळ रास (Libra Zodiac)
साप्ताहिक टॅरो कार्डनुसार, मे महिन्याचा पहिला आठवडा तुम्हाला प्रचंड लाभ मिळवून देऊ शकतो. जर तुमचे काम वाणीशी संबंधित असेल तर तुम्हाला आयत्या काळात मोठा लाभ व संधी मिळू शकतात. तुम्हाला आयुष्यभर पुरणारे काही संपर्क या काळात बनवता येतील.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
साप्ताहिक टॅरो कार्डनुसार, तुम्हला धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. शेअर बाजारात गुंतवणूक लाभाची ठरू शकते. सेकंड हॅन्ड गोष्टींची खरेदी करण्यासाठी हा काळ लाभदायक असू शकतो पण काळजीपूर्वक निर्णय घ्या.
धनु रास (Sagittarius Zodiac)
साप्ताहिक टॅरो कार्डनुसार, मे महिन्यात आपल्या नातेवाईक व जवळच्या व्यक्तींशी संबंध सुधारू शकतात. जुन्या मित्रांशी भेट होऊ शकते. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागू शकते. आर्थिक चणचण सुद्धा वाढू शकते.
मकर रास (Capricorn Zodiac)
साप्ताहिक टॅरो कार्डनुसार, नोकरदार मंडळींना मे महिन्यात एखादी शुभ वार्ता मिळू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढीस लागू शकतो. शत्रूंवर विना बोलता थेट मात करू शकाल.
कुंभ रास (Aquarius Zodiac)
साप्ताहिक टॅरो कार्डनुसार, मे महिन्याच्या सुरुवातीला तुमची अडकून पडलेली कामे मार्गी लागू शकतात तसेच तुम्हाला अडकलेले पैसे न मागता परत मिळू शकतात. वैवाहिक आयुष्यात संयम बाळगावा लागेल. वेळेची बचत करा.
हे ही वाचा<< ६० दिवसांनी उद्या लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? ‘या’ मार्गे होऊ शकता करोडपती
मीन रास (Pisces Zodiac)
साप्ताहिक टॅरो कार्डनुसार, तुम्हाला जोडीदाराची भक्कम साथ लाभू शकते, नोकरी करणाऱ्यांच्या आयुष्यात अर्थाजनाचे नवे मार्ग सुरु होतील, नवीन घर- गाडी किंवा सोन्याच्या खरेदीचा योग आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)