Shani Budh Yuti 2025 : २०२४ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही आठवडे शिल्लक आहेत. त्यानंतर नवीन वर्ष २०२५ ला सुरुवात होईल. ज्योतिषशास्त्रानुसार २०२५ हे वर्ष ग्रहांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. या वर्षी अनेक ग्रह राशिबदल करून, दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यासह अनेक शुभ ग्रहांचा संयोग होणार आहे. या संयोगाचा सर्व १२ राशींच्या लोकांवर परिणाम होईल. द्रिक पंचांगानुसार २०२५ च्या सुरुवातीला कुंभ राशीमध्ये बुध व शनिदेव यांचा शुभ संयोग होणार आहे. सुमारे ३० वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये शनी आणि बुध यांचा संयोग होणार आहे. या विशेष संयोगाचा प्रभाव काही राशींसाठी खूप शुभ राहील. त्या राशींना नोकरी, व्यवसाय व पैशाच्या बाबतीत मोठे यश मिळू शकते. नेमक्या कोणत्या राशींना या संयोगाचा फायदा होईल ते जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनी-बुधाच्या संयोगाने ‘या’ राशींना मिळणार अमाप पैसा

मेष

नवीन वर्षातील शनी आणि बुधाच्या संयोगामुळे मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम काळ राहील. २०२५ मध्ये उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात समृद्धी येईल. या काळात केल्या गेलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. मुलांना अभ्यास आणि करिअरमध्ये यश मिळू शकेल. एकूणच या वर्षी तुम्हाला फक्त नफाच मिळणार आहे.

Budh Uday 2024 : ९ तासांनंतर बुध उदयाने एका झटक्यात ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही व्हाल कोट्यधीश?

मकर

२०२५ हे वर्ष मकर राशीच्या लोकांसाठी आनंददायी असेल. या वर्षी तुम्ही नवीन लोकांना भेटाल आणि तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते. लेखन, प्रसारमाध्यमे आणि संवादाशी संबंधित लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. रखडलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतात. न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळेल. २०२५ मध्ये नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. शनिदेवाच्या कृपेने तुमची बिघडलेली कामे मार्गी लागतील.

shukra-shani Yuti : २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींवर धन-सुखाची बरसात; शुक्र-शनी युतीने प्रेमात यश अन् नोकरी, व्यवसायातून मिळेल बक्कळ पैसा

कुंभ

नवीन वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरेल. या वर्षी तुम्हाला मान-सन्मान मिळेल. आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रगती साधता येईल. नोकरदारांना बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. शनिदेवाच्या राजयोगामुळे तुम्हाला जीवनात प्रगती आणि यश मिळू शकते.

(टीप- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani budh yuti 2025 conjuction of shani and budh will change the luck of these zodiac signs budha gochar in kumbha new year sjr