Shani-Budh Yuti 2025 : ग्रहांचा राजा बुध हा एका विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो; ज्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होत असतो. बुध ग्रहाला एकाग्रता, बौद्धिक क्षमता, शिक्षण, व्यवसाय, वादविवाद इत्यादींचा कारक मानले जाते. अशा परिस्थितीत बुध ग्रहाच्या राशीतील बदलांमुळे १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुधाने ११ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. तसेच शनीदेखील या राशीत स्थित आहे; ज्यामुळे दोन्ही ग्रहांची युती झाली आहे. शनी आणि बुध यांच्या युतीमुळे काही राशीच्या लोकांना व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रात खूप फायदे मिळणार आहेत. पण, नेमक्या कोणत्या राशींना मोठे फायदे मिळू शकतात ते जाणून घेऊ…
बुध- शनीच्या युतीने ‘या’ राशी होतील श्रीमंत! मिळेल नोकरी, व्यवसायात यश (Shani-Budh Yuti 2025)
मिथुन
बुध आणि शनीची युती मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या सुखसोईंमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. कामानिमित्त तुम्हाला लांबचा किंवा परदेशात प्रवास करावा लागू शकतो; पण यातून तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. नशिबाच्या जोरावर तुम्हाला मोठी ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात. आर्थिक लाभाच्याही सर्व शक्यता आहेत. त्यासह तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकता. प्रेमी जीवनामध्ये सुखाचे क्षण येतील.
सिंह
शनी-बुध युती सिंह राशीसाठी फलदायी ठरू शकते. सिंह राशीच्या लोकांच्या जीवनावरही अनुकूल परिणाम होऊ शकतो. तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमच्या कामाचे कौतुकही होऊ शकते. सिंह राशीच्या लोकांना आता त्यांच्या काम आणि मेहनतीचे फळ मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याच्याही अनेक शक्यता आहेत. तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते.
तूळ
बुध आणि शनीची युती तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तूळ राशीच्या लोकांचा कल अध्यात्माकडे अधिक असेल. त्यासह तुम्ही अनेक धार्मिक यात्रादेखील करू शकता. तुमचा आत्मविश्वास वेगाने वाढेल; ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामात खूप यश मिळवू शकता. व्यापार आणि शेअर बाजाराशी संबंधित व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीतही तुम्ही भाग्यवान ठरू शकता. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. तसेच आरोग्यही चांगले राहील.