Shani-Budh Nakshatra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. पंचांगानुसार, ३ एप्रिल रोजी बुध गुरूच्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. याच नक्षत्रामध्ये आधीपासून शनीदेव विराजमान आहेत. ज्यामुळे या नक्षत्रात बुध आणि शनीची युती निर्माण होईल. ज्याचा फायदा १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल.

शनी-बुध देणार पैसाच पैसा

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींना शनी-बुधाच्या युतीचा चांगला फायदा होईल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल. नवीन जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतील.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींना शनी-बुधाच्या युतीचे अनेक चांगले फायदे होतील. या संयोगामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. बेरोजगारांना नोकरी मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल.

मीन

मीन राशीच्या व्यक्तींनाही शनी-बुधाची युती शुभ फळ प्राप्त करून देणारी असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. अडकलेले पैसे मिळतील. आत्मविश्वासात वाढ होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)