Shani Signs In Dream: स्वप्नांमध्ये देवी देवतांचे फोटो, मूर्ती किंवा अगदी पुसट स्वरूप दिसणं हे शुभ- अशुभ संकेत देतं. आपण स्वप्नात काय पाहणं हे शुभ व अशुभ असतं याबाबत स्वप्न शास्त्रात माहिती देण्यात आली आहे. शनिदेव हे कलियुगात दंडाधिकारी म्हणून ओळखले जातात. माणसाला आपल्या कर्माचे शुभ- अशुभ फळ देण्याचे काम शनिदेव करतात अशी मान्यता आहे. आपल्या कर्माचं फळ देणाऱ्या शनिदेवाची वक्रदृष्टी ही माणसाला मोठे नुकसान पोहचवू शकते असा समज आहे तर शनीच्या आशीर्वादाने प्रचंड धनलाभ होतो असेही मानले जाते.
ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार शनिदेव प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे मानवाला संकेत देत असतात, यातील एक मार्ग म्हणजे स्वप्नात शनि किंवा शनिच्या संबंधित वस्तू व प्राणी दिसणे. जर आपल्याला स्वप्नात शनिदेव किंवा त्यांचे वाहन, मूर्ती, फोटो दिसला तर त्याचा काय प्रभाव होतो हे कुंडलीवर अवलंबून असते. याबाबत साधारण काय मान्यता आहेत जाणून घेऊयात..
हे ही वाचा<< १३ मार्च २०२३ पर्यंत ‘या’ ३ राशींना होणार बक्कळ धनलाभ? मंगळ व लक्ष्मी कृपेने तुम्हीही होऊ शकता प्रचंड श्रीमंत
शनिदेव देतात धनलाभाचे ‘हे’ संकेत
स्वप्नात शनिदेव दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. जेव्हा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार असतात तेव्हा शनिदेव दर्शन देतात असे मानले जाते. शनिदेव विशेषतः धनलाभाच्या रूपात तुम्हाला मेहनतीचे फळ देऊ शकतात. जेव्हा तुम्हाला शनिदेव फोटोच्या रूपात दिसतात तेव्हा तुम्हाला लवकरच शुभ वार्ता मिळणार असल्याचे संकेत असतात, नोकरीच्या संधी तुमच्या नशिबाचे दार ठोठावू शकतात. शनिदेवाच्या मूर्तीच्या आकाराचे आपल्याला निसर्गात दर्शन झाल्यास तुमच्या कुटुंबाला एकत्रिक लाभण्याचे संकेत मानले जातात.
हे ही वाचा<< केंद्र त्रिकोण राजयोगाने ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? येत्या ३० दिवसात शनि व बुधदेव देऊ शकतात बक्कळ धनलाभ
जर आपल्याला शनिदेवाचे वाहन म्हणजे कावळा दिसत असेल तर तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होणार असल्याचे मानले जाते. मात्र तुम्हाला मृत कावळे दिसणे किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती दिसणे हे अशुभ मानले जाते.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे. अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही, तसेच आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही)