Shani Chandra Grahan: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या हालचालींना एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. त्यात शनीलाही खूप महत्त्वाचे स्थान आहे. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळदाता ग्रह, असं म्हटलं जातं. पण, आता तब्बल १८ वर्षांनंतर एक दुर्मीळ योग जुळून येत आहे. भारतात २४ व २५ जुलैच्या मध्यरात्री शनी आणि चंद्र एकमेकांच्या समोर येणार आहे.

या काळात शनी चंद्राच्या मागे लपणार असून, चंद्राच्या कडेवरून शनीचं एक वलय तयार होणार आहे. खगोलशास्त्रीय संशोधक या अद्भुत योगासंबंधीचं संशोधन करीत आहेत.

shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार! गुरु ग्रह होणार मार्गी, मिळेल पद-प्रतिष्ठा
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
shani surya budha will make tigrahi yog 2025
Tirgrahi Yog 2025 : ५० वर्षांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब! बुध, सूर्य अन् शनीच्या संयोगाने होतील गडगंज श्रीमंत, वाढेल मानसन्मान
The luck of these zodiac signs will shine on January 28th
२८ जानेवारीला चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शुक्र ग्रह निर्माण करणार मालव्य राजयोग!
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार
When will the solar and lunar eclipses
वर्ष २०२५मध्ये केव्हा लागणार सुर्यग्रहण आणि चंद्रग्रहण! जाणून घ्या तारीख आणि भारतात कधी दिसणार की नाही?

शनी – चंद्राचा दुर्मिळ योग केव्हा जुळून येणार? (Shani Chandra Grahan)

खगोलशास्त्राच्या अंदाजानुसार २४ जुलै रोजी रात्री ०१:३० वाजता आकाशात शनी आणि चंद्र यांच्यातील दुर्मिळ घटना पाहायला मिळणार आहे. रात्री ०१ वाजून ४४ मिनिटांनी शनी चंद्राच्या मागे लपणार असल्यानं चंद्र त्याला संपूर्णतया झाकून टाकणार आहे. तसेच रात्री ०२ वाजून २५ मिनिटांनी शनी ग्रह चंद्राच्या कक्षेतून बाहेर निघताना दिसेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

भारतासह ‘या’ देशांत शनी चंद्रग्रहण दर्शन

हे शनी चंद्र यांच्यातील ही महत्वाची खगोलीय घटना भारताबरोबरच चीन, श्रीलंका, जपान व म्यानमार या देशांमध्येदेखील पाहायला मिळणार आहे. या घटनेला ‘लूनार ऑकल्टेशन ऑफ सॅटर्न’ (Lunar occultation of Saturn) असं नाव देण्यात आलं आहे. आपल्या गतीनं चाललेले दोन ग्रह जेव्हा आपला मार्ग बदलतात तेव्हा शनी ग्रह चंद्राच्या मागून उगवतो. त्यामध्ये सर्वांत आधी शनीचे वलय स्पष्टपणे दिसते. हा अद्भुत योग खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी फार औत्सुक्याचा विषय आहे. ही खगोलीय घटना फक्त फक्त दुर्बिणीने दिसू शकतं.

हेही वाचा… शिवीगाळ केली अन्…., बिहारमधील ट्रेनमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून व्हाल थक्क

ऑक्टोबरमध्ये पुन्हा दिसणार हे दृश्य

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, तीन महिन्यांनंतर शनी चंद्र यांच्यातील दुर्मिळ योग पुन्हा भारतात दिसणार आहे. तसेच, खगोलशास्त्राच्या अंदाजानुसार जर काही कारणांमुळे जुलै महिन्यात हे चंद्रग्रहण दिसलं नाही, तर १४ ऑक्टोबरला हे चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळेल.

(टीप: हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)

Story img Loader