Anuradha Nakshatra In Kundli: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी आपले स्थान बदलून राशी परिवर्तन करतात, पण नक्षत्र परिवर्तन हे बऱ्याच कालावधीने पार पडते. अर्थात याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. नक्षत्रांचे परिवर्तन काही राशींसाठी लाभदायक ठरते तर काहींना अमात्र या काळात अपार कष्ट व त्रास सहन करावा लागतो. यावेळेस वृश्चिक राशीत बुध, शुक्र व पाठोपाठ शुक्र गोचर झाले आहे. हे तीन ग्रह मंगळाच्या राशीत व शनीच्या नक्षत्रात म्हणजेच अनुराधा नक्षत्रात स्थिर होणार आहेत. याचा प्रभाव काही राशींच्या मंडळींसाठी अत्यंत लाभदायक स्थिती घेऊन आला आहे. चला तर मग पाहुयात येत्या काळात शनि व मंगळ युती कुणाला देणार लाभ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Graha Gochar Benefits: कर्क

बुध, सूर्य व शुक्र अनुराधा नक्षत्रात विराजमान झाल्याने कर्क राशीच्या व्यक्ती लाभदायक स्थितीत असणार आहेत. या काळात आपली अडकलेली कामे मार्गी लागू शकतील. तसेच जुन्या गुंतवणुकीतून प्रचंड धनलाभ होऊ शकतो. येत्या काळात घरगुती किंवा तुमच्यातील एखाद्या कलेमुळे आर्थिक मिळकतीचे मार्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. जर आपण या काळात प्रॉपर्टी खरेदी करू इच्छित असाल तर नक्कीच एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार करू शकता. आलिशान जीवनशैली व भौतिक सुखाचे योग आपल्या राशीच्या कुंडलीत प्रबळ होताना दिसत आहेत. या काळात समाजात आपला मान- सन्मान वाढण्याची शक्यता आहे.

Rashi Parivartan 2022 December: मकर

मकर ही शनिची आवडती रास आहेच तर मंगळही मकर राशीत शुभ स्थानी स्थिर आहेत. यामुळेच अन्य तीन ग्रह म्हणजेच सूर्य, शुक्र व बुध यांच्या गोचराचा मकर राशीला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. या काळात आपल्याला व्यवसाय वृद्धीचे संकेत आहेत, किंवा आपल्याला आणाव्या नोकरीचे प्रस्ताव येऊ शकतात ज्यामुळे अर्थात आर्थिक लाभ वाढून बक्कळ पैसे तुम्ही कमावू शकता. एखाद्या शुभ कार्याच्या निमित्ताने जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. वर्षाअखेरीस आपल्या भाग्यात प्रवासाचे योग तयार होत आहेत.

Shani Margi In 2023: कुंभ

कुंभ राशीवर शनिदेव नेहमीच प्रसन्न असतात परिणामी या राशीच्या मंडळींना इतरांच्या तुलनेत मेहनतीचे फळ अधिक लाभते. येत्या काळात शनिसह सूर्य, बुध व शुक्र यांचीही साथ तुम्हाला लाभणार आहे. जर तुम्ही एखादी परीक्षा देत असाल किंवा नव्या कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असाल तर नक्कीच हा काळ लाभदायक ठरू शकतो.

हे ही वाचा<< मेष ते मीन, तुमच्या राशीत शनि कधी होणार वक्री? ‘या’ ३ राशींना २०२३ मध्ये साडेसातीतून मिळणार सुटका

तुम्हाला कुटुंब सुख लाभणार आहे, जोडीदाराच्या बाबत तुमचे निर्णय कसे योग्य ठरले हे सांगणारा हा पुढील काळ असणार आहे. कामाच्या ठिकाणी आपल्याला हवे तसे बदल करून घेता येतील. जे काम यापूर्वी बिघडत होते ते यापुढील काळात अगदी सहज पूर्ण करता येईल असे योग आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती व गृहीतके यांच्यावर आधारित आहे)