Shani Nakshatra Parivartan: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिषशास्त्रात शनिला महत्त्वाचं स्थान आहे. शनि अत्यंत धीम्या गतीने आपली चाल बदलतो. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात मंद गतीने जाणारा ग्रह आहे, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी ३० वर्षे लागतात. सध्याच्या काळात शनी कुंभ राशीत मूळ त्रिकोण राशीत आहे आणि २०२५ पर्यंत राहणार आहे. शनिदेवाने नुकतेच पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या पदात गोचर केलं आहे आणि येत्या १८ आॅगस्टला शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या पदात गोचर करणार आहेत. अशा शनिदेवाच्या स्थितीमुळे काही राशींना ८८ दिवस मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया नशीबवान राशी कोणत्या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा