Shani Dev : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव संपूर्ण २०२४ हे वर्ष कुंभ राशीमध्ये विराजमान राहणार आहे. जूनमध्ये शनिदेव वक्री स्थितीत मार्गक्रमण करणार. वक्री स्थितीत शनि देव उलट दिशेने मार्गक्रमण करणार. शनि देवाची उलट चालीचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण तीन अशा राशी आहेत ज्यांना आकस्मित धनलाभ मिळू शकतो आणि यश मिळवण्याचे चांगले योग जुळून येतील. याबरोबरच या राशींवर शनिदेवाचा विशेष आशीर्वाद दिसून येईल. त्या तीन राशी कोणत्या, जाणून घेऊ या.
मेष
शनिदेवाच्या उलट चालीचा थेट लाभ मेष राशीला होऊ शकतो. कारण शनिदेव या राशीच्या उत्पन्नाच्या स्थितीवर वक्री राहणार ज्यामुळे या लोकांच्या धनसंपत्तीत कमालीची वाढ दिसून येऊ शकते.याशिवाय ज्या प्रकल्पात या राशीचे लोकं गुंतवणूक करतील, त्यांना भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कमावण्याचे नवनवीन साधने मिळतील. या दरम्यान या राशीच्या व्यायसायिकांना सुद्धा लाभ होऊ शकतो ज्याचे फायदे त्यांना भविष्यात मिळतील. सुख सुविधा वाढतील आणि करिअरमध्ये या राशीच्या लोकांच्या सर्व महत्त्वकांक्षा पूर्ण होतील.
हेही वाचा : शनिवार, ६ जानेवारी पंचाग: तुमच्या राशीनुसार आज कोणत्या बाबतीत घ्यावी काळजी? घरी वातावरण कसे असेल पाहा
मकर
शनिदेवाच्या वक्री होण्याचा फायदा मकर राशीच्या लोकांना होईल.शनि देव मकर राशीचे स्वामी ग्रह आहे. याशिवाय शनिदेव या राशीत धनच्या स्थानावर आहे. त्यामुळे यावेळी यांनाआकस्मित धनलाभ होऊ शकतो. करीअरमध्ये हे उंच भरारी घेईल आणि मनाप्रमाणे यश मिळवतील. धनसंपत्तीत वाढ होणार आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यवसाय करणाऱ्यांना अडकलेले पैसे परत मिळतील. जर या राशीचे लोकांचे करिअर मीडिया, मार्केटिंग, शिक्षण, आणि बँकिग क्षेत्राशी संबंधित असेल तर हा काळ त्यांच्यासाठी शुभ राहू शकतो.
वृषभ
शनिदेवाची उलट चाल वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीकोनातून उत्तम ठरू शकते. शनिदेव या राशीच्या कर्म स्थानावर आहे.त्यामुळे जे लोकं शिक्षण पूर्ण घेऊन नोकरी शोधत आहे त्यांना या काळात नोकरी मिळू शकते. जर तुम्ही नवीन व्यवसाय शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. याशिवाय नोकरी करण्याऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. याशिवाय नोकरीमध्ये बढोत्तरी मिळू शकते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)