ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि कमजोर असेल तर त्या व्यक्तीला अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते. याउलट, जर शनि बलवान असतो तर माणसाचे चांगले दिवस सुरु होतात. असं म्हटलं गेलंय की शनिवारी सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. तसेच, शनिदेवाला प्रसन्न करण्याचे इतरही अनेक उपाय आहेत. हे उपाय कोणते आहेत आणि त्याने काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊया.
- गायीला पोळी खाऊ घाला
शनिच्या साडेसातीचा सामना करावा लागू नये यासाठी ज्योतिषशास्त्रात एक सोपा उपाय सांगितला गेला आहे. असं सांगण्यात आलंय की शनिवारी सूर्यास्तानंतर गायीला तेल लावलेली पोळी खाऊ घातल्यास कुंडलीतील शनिची स्थिती मजबूत होते.
Guru Vakri 2022: मीन राशीमध्ये गुरु होणार प्रतिगामी; ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार जबरदस्त लाभ
- शनिवारी शनिची उपासना करा
बरेच लोक शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी उपवास करतात. तसेच, इतरही अनेक उपाय करतात. जेणेकरून शनीच्या साडेसातीपासून त्यांचा बचाव होईल. या उपायांमुळे शनिदेव प्रसन्न होतात असे म्हणतात. यासोबतच शनिवारी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान वगैरे आटोपल्यानंतर शनिदेवाची पूजा करावी. हे जीवनातील दु:ख, कलह आणि अपयश दूर करते.
- ज्योतिष शास्त्रानुसार मोहरीच्या तेलात लोखंडाचा खिळा टाकून दान करा. तसेच ते पिंपळाच्या मुळामध्ये अर्पण करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात.
- या दिवशी छाया दानाचेही विशेष महत्त्व आहे. पितळेच्या भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात चेहरा पहा आणि नंतर ते शनि मंदिरात ठेवा.
- तेलाचे पराठे बनवून त्यावर काही गोड पदार्थ ठेवून गायीच्या वासराला खायला दिल्यास खूप फायदा होतो.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)