Shani Dev Blessing On Zodiac Signs: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हे कर्मदाता म्हणून ओळखले जातात. २०२३ हे वर्ष शनीच्या गोचराने समृद्ध झाले आहे. यंदा तब्बल ३० वर्षांनी शनिदेव स्वराशीत स्थिर झाले आहेत. या गोचराने काही राशींच्या कुंडलीतून शनीची महादशा व साडेसाती तसेच धैय्या (अडीच वर्ष टिकणारा प्रभाव) संपुष्टात आला आहे. तर ज्योतिष तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढील अडीच वर्ष शनिदेव ज्या राशीत स्थिर असणार आहेत त्या राशी योगायोगाने शनीच्या प्रिय राशी मानल्या जातात. म्हणजेच शनीचा प्रभाव या राशींवर वाईट नव्हे तर उलट अधिक लाभदायी दिसून येऊ शकतो. पुढील अडीच वर्ष म्हणजेच साधारण २०२५ पर्यंत खालील तीन राशींवर शनीची कृपा कायम राहण्याची शक्यता आहे. या राशींना नेमक्या कोणत्या स्वरूपात लाभ होऊ शकतो हे पाहुयात…

पुढील अडीच वर्ष ‘या’ राशींवर राहील शनीची कृपा?

कुंभ रास (Kumbh Rashi)

कुंभ राशीत पुढील अडीच वर्ष शनिदेव स्थिर असणार आहेत व त्याचा शुभ प्रभाव तुमच्या कामावर व प्रगतीवर दिसून येऊ शकते. शनिदेव पुढील अडीच वर्षात तुमच्या स्वप्नांना दिशा देऊ शकतील तसेच कौटुंबिक सुखही तुमच्या भाग्यात दिसून येत आहे. सूर्य व राहू भ्रमणाने तुमच्या राशीवर २०२३ च्या मध्यात काहीसा संकटाचा काळ येऊ शकतो पण या ही वेळेस शनिदेव तुमची ढाल बनू शकतील . तुमची आर्थिक स्थिती भक्कम होऊन तुम्हाला गुंतवणुकीचा मोठा फायदा होऊ शकतो. वाडवडिलांच्या संपत्तीमुळे तुम्हाला प्रचंड मोठी धनलाभाचे संधी मिळू शकते.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
sun shani and shukra grah yuti
पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी मिळणार; ३० वर्षानंतर सूर्य, शनी आणि शुक्र निर्माण करणार ‘त्रिग्रही योग’; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
shani surya budha will make tigrahi yog 2025
Tirgrahi Yog 2025 : ५० वर्षांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब! बुध, सूर्य अन् शनीच्या संयोगाने होतील गडगंज श्रीमंत, वाढेल मानसन्मान

वृषभ रास (Taurus Zodiac)

शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत १० व्या स्थानी स्थिर असल्याने येथे या वर्षभरात शश महाराजयोग तयार होत आहे. ही स्थिती पुढील अडीच वर्ष कायम असणार आहे. व्यवसायासाठी पुढील दोन वर्ष अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतात. तुम्हाला नशिबाची साथ लाभल्याने व भाग्यभावात शनिदेव स्थिर असल्याने तुम्हाला शनीचा आशीर्वाद लाभु शकतो. तुम्हाला क्रिएटिव्ह गोष्टी करण्याची संधी मिळू शकते, नाटक, लेखन, काव्य अशा क्षेत्रात तुम्ही मोलाची कामगिरी करू शकता.

हे ही वाचा<< ३० एप्रिलपर्यंत कोणत्या राशींना बक्कळ धनलाभ, कोणावर संकट? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

मिथुन रास (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या नवव्या स्थानी शनी देव स्थित आहेत त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ लाभू शकते. येणारी अडीच वर्षे तुम्हाला राजयोग असल्याने तुम्ही परदेश प्रवास करू शकता. तसेच आध्यत्मिक विकासाने तुमची मानसिक स्थिती शांत व निवांत राहू शकते. नोकरदार मंडळींना करिअरमध्ये मोठी झेप घेता येईल तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश लाभू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader