Shani Margi Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. शनि देव हे न्यायाचे देवता आहेत अशी धारणा आहे. शनि देव प्रत्येकाला कर्मानुसार फळ देतात अशीही भक्तांची भावना आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ, मकर, कुंभ ही शनि प्रभावाने सर्वात फायद्यात राहणारी रास असते तर मेष, मिथुन या दुर्बळ राशी मानल्या जातात. असं म्हणतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि प्रभावाने राजयोग तयार होतो अशा व्यक्तींचे भाग्य उजळून त्यांच्याकडील धन व त्यांना मिळणारा मान या दोन्हीमध्ये वृद्धी होऊ शकते. अशा व्यक्तींना अनपेक्षित लाभ होण्याचे संकेत असतात. मागील काही काळातील ग्रहांच्या हालचालीनुसार शनिदेवाने काही खास राशींमध्ये राजयोग तयार केले आहेत. हे योग नेमके कोणते व यामुळे कुणाला काय लाभ होणार हे आपण जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शश महापुरुष योग

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि संक्रमणाने शश महापुरुष योग तयार होतो. जेव्हा शनि मकर, कुंभ किंवा तूळ राशीत विराजमान असतो तेव्हा हा खास राजयोग जुळून येतो. तसेच या योगाच्या निर्मितीसाठी शनि लग्न केंद्रात स्थिर असणे गरजेचे आहे. या योगाचा प्रभाव हा मानवी जीवनावर अत्यंत शुभ ठरू शकतो. यामुळे व्यापारात वृद्धी व परिणामी धनलाभाच्या संधी खुल्या होतात. महापुरुष राजयोगामुळे मेहनतीला दिशा व त्याचे उचित फळ प्राप्त होते अशी मान्यता आहे. शनि मार्गी होऊन कुंभ राशीत महापुरुष योग निर्माण होत आहे, याचा प्रभाव मुख्यतः मकर, मिथुन व वृषभ या तीन राशींवर दिसून येणार आहे.

सप्तमस्थ शनि योग

ज्योतिषांच्या माहितीनुसार जेव्हा शनि देव जन्मकुंडलीत सातव्या स्थानी विराजमान होतात तेव्हा हा सप्तमस्थ योग तयार होतो. हे स्थान शनिच्या प्रभावासाठी सर्वात शुभ मानले जाते. या व्यक्तींना कमी वेळात हुशारीने धनवान होण्याची संधी असते. शनि जेव्हा सप्तम भावी स्थिर होतो तेव्हा राशींच्या कुंडलीत प्रगतीचीचे योग असतात. ज्यांना भौतिक सुखाचे आकर्षण असते त्यांना या योगामुळे सर्वाधिक फायदा होऊ शकतो. शनिच्या प्रभावाने यंदा मेष, वृश्चिक राशीसाठी सप्तमस्थ योग तयार होत आहे, या राशीच्या विवाह इच्छुक व्यक्तींसाठी लग्न जुळण्याची चिन्हे आहेत.

शनि- शुक्र योग

शनि व शुक्राच्या युतीने धन, वैभव, ऐश्वर्य व भौतिक सुखाचे योग जुळून आले आहेत. शनि देव कर्म व स्थैर्याचे कारक आहेत. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनि व शुक्र एकत्र विराजमान होतात त्यांना धनप्राप्तीसह भौतिक सुखप्राप्तीचीही सुवर्णसंधी तयार होते .यावेळेस शुक्र हा वृश्चिक व मकर राशीत स्थिर झाला आहे, या राशींना शनिच्या गोचरामुळे सुख व अपार वैभवाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. मीडिया, फिल्म, फॅशन डिझाईनिंग व संबंधित क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना सुद्धा प्रसिद्धीची संधी तयार होत आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani dev margi rare raj yog in kundali of these zodiac signs will get immense money new job and wedding svs