Shani Grah Vakri 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी देव हे आयुष्य, दुःख, आरोग्य, विज्ञान, श्रम- कर्म व न्यायाचे देवता मानले जातात. त्यामुळेच शनीच्या स्थितीतील लहानसा बदल सुद्धा सर्व १२ राशींच्या आयुष्यात उलथापालथ करून जातो असा समज आहे. यंदाचे वर्ष हे शनीच्या सर्वात महत्त्वाच्या हालचालींचे वर्ष आहे. १७ जानेवारी २०२३ ला शनिदेव स्वराशीत म्हणजेच कुंभमध्ये प्रवेश घेऊन स्थिर झाले होते. यानंतर सहा महिन्यांनी म्हणजेच १७ जून २०२३ ला शनी पुन्हा वक्री अवस्थेत आले आहेत. आणि आता आज म्हणजेच २९ ऑगस्ट २०२३ ला शनीची शक्ती ही सर्वात जास्त असणार आहे. साहजिकच याचा कटू- गोड प्रभाव हा सर्वच राशींवर पाहायला मिळू शकते. पण त्यातही तीन अशा राशी आहेत ज्यांच्यासाठी शनिदेव सोन्याच्या संधी घेऊन आले आहेत. या मंडळींना प्रचंड धनलाभासह कोट्याधीश होण्याची सुद्धा संधी आहे. या नशीबवान राशी कोणत्या चला पाहूया …
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा