Shanidev Mantra: ज्योतिषशास्त्रामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस ग्रह आणि विशिष्ट देवी-देवतांना समर्पित करण्यात आला आहेत. त्यानुसार लोक ग्रहांची आणि देवी-देवतांची पूजा-आराधना करतात. ज्याप्रमाणे सोमवार चंद्र ग्रह आणि भगवान महादेवाला समर्पित आहे, त्याप्रमाणे मंगळवार मंगळ ग्रह आणि गणपतीला समर्पित आहे. आज शनिवारचा दिवस शास्त्रानुसार शनीदेव आणि हनुमानालाही समर्पित आहे. कुंडलीतील दोषांचे निवारण करण्यासाठी अनेकजण शनीची पूजा-आराधना करतात. शनीची अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक शनिवारी तुम्ही एका प्रभावी मंत्राचा जप करू शकता.

ज्योतिषशास्त्रानुसार, शनीदेवाला न्यायदाता आणि कर्मफळदाता म्हटले जाते, शनीच्या प्रत्येक व्यक्तीच्या कर्मावर करडी नजर असते. सुकर्म करणाऱ्यांवर शनीच्या साडेसाती किंवा कुंडलीतील वाईट स्थितीचा फारसा परिणाम होत नाही. दरम्यान, शनीचा हा प्रभावी मंत्र तुमचं आयुष्य बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो.

प्रत्येक शनिवारी करा या प्रभावी मंत्राचा जप

शनी मंत्र

ॐ शं शनैश्चराय नमः।

शनी महामंत्र

ॐ निलान्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम॥

शनी गायत्री मंत्र

ऊँ भगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात् ॥

शनी मंत्राचा जप कसा करावा?

शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करावे. त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर देवघरात धूप, दीप लावून वरील तीन पैकी कोणत्याही एका मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेने १०८ वेळ जप करावा. या दिवशी तुम्ही शनी मंदिरात जाऊनदेखील या मंत्राचा जप करू शकता.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)