नवग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रात, शनिदेव वाईट आणि चांगल्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळ प्रदान करतात, असं म्हटलं जाते. प्रत्येक अडीच वर्षांनी शनिच्या राशीत बदल होतो. जेव्हा जेव्हा शनिचे संक्रमण होते तेव्हा काही राशींवर त्याचा प्रभाव पडतो. शनि सध्या कुंभ राशीमध्ये पूर्वगामी अवस्थेत आहे, त्यामुळे ‘त्रिकोण राजयोग’ तयार झाला आहे. त्याचवेळी नोव्हेंबरमध्ये शनिदेव प्रत्यक्ष होताच ‘शश राजयोग’ तयार होईल. ज्योतिषशास्त्रात, हे दोन्ही राजयोग अत्यंत शुभ मानले जातात. या दोन्ही योगांचा प्रभाव वर्ष २०२३ अखेरपर्यंत राहील, त्यामुळे काही राशींना फायदा होऊ शकतो. तसेच नोकरी आणि व्यवसायात मोठं यश मिळण्याचीही शक्यता आहे. पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींना मिळणार अपार पैसा?
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रिकोण आणि शश राजयोग सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरु शकतो. या काळात नफा कमावण्याच्या संधी मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक प्रगती होऊ शकते. जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत होते शनिदेव त्यांची मनोकामना पूर्ण करु शकतात.
सिंह राशी
शनिदेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांवर शश आणि त्रिकोण राजयोगाचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो. या काळात या लोकांच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. घर आणि वाहन खरेदीचे योग जुळून येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ मिळू शकते. व्यवसायातही अपेक्षित लाभ होऊ शकतो.
(हे ही वाचा: येत्या दोन दिवसात ‘या’ चार राशींचे सुखाचे दिवस सुरु? सूर्य-शनीचा अशुभ प्रभाव संपल्याने मिळू शकतो बक्कळ पैसा)
तूळ राशी
शनिदेवाच्या दोन्ही राजयोगांचा तूळ राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडू शकतो. या काळात धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे समाधान आणि आनंद मिळू शकतो.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी त्रिकोण आणि शश राजयोग वरदानापेक्षा कमी असणार नाही. या काळात या राशीच्या लोकांना शनिदेवाची कृपा लाभू शकते. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक प्रगती होऊ शकते. खाजगी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या काळात गरजूंना मदत करण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)