Shani Dev : ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा थेट परिणाम विविध राशींवर होतो. एखाद्या ग्रहाच्या अस्त आणि उदयममुळे राशीचक्रातील इतर राशींवर याचा चांगला वाईट परिणाम दिसून येतो. यावेळी शनिदेव अस्त स्थितीत आहे पण १८ मार्च नंतर शनिदेव उदय स्थितीत येणार आहे. शनिच्या बदलत्या चालीमुळे इतर राशींच्या लोकांना दिलासा मिळेल आणि त्यांना फायदा सुद्धा होईल.शनि त्यांच्या कुंभ राशीत दिसून येईल.
ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाच्या उदयनंतर न्याय देवतेजवळ भरपूर शक्ती असेल. याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. अनेक लोकांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. विशेषत: तीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येईल. जाणून घेऊ या त्या तीन राशी कोणत्या?

वृषभ

शनिदेवाचा उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या लोकांच्या करिअरमध्ये शुभ गोष्टी दिसून येईल. नोकरी पासून व्यवसाय करणाऱ्यांपर्यंत सर्वांना फायदा होऊ शकतो. जे लोक धनप्राप्तीसाठी कठीण परिश्रम घेत होते, त्यांना यश मिळेल. या राशीच्या लोकांची आर्थिक वृद्धी होईल. जर या लोकांनी एखादे नवीन काम सुरू करायचे असेल तर हा काळ शुभ ठरेल. या लोकांच्या कामाचे कौतुक केले जाईल आणि प्रत्येक ठिकाणी सन्मान प्राप्त होईल. मेहनतीचे फळ मिळेल.

हेही वाचा : Sagittarius Compatibility : असा असतो धनु राशीचा स्वभाव, ‘या’ तीन राशीच्या लोकांबरोबर अजिबात पटत नाही

तुळ

शनिच्या उदयमुळे तुळ राशीच्या लोकांचे नशीब बदलताना दिसून येईल. या राशीच्या लोकांचे भाग्य चमकेल. शनिदेवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना जीवनात यश मिळेल आणि व्यवसायात प्रगती होईल. व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो. या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. हे लोकं कर्ज आणि संकटातून बाहेर पडेल. या लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर होईल.मन प्रसन्न राहील आणि जीवनात भरपूर यश मिळेल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी शनि ग्रहाचा उदय फायदेशीर ठरेल. जे लोकं नोकरीच्या शोधात आहे त्यांना यश मिळू शकते. नोकरी ट्रान्सफरसह प्रमोशनसुद्धा होऊ शकते. व्यक्तीला सुख आणि समृद्धी लाभेल. धनप्राप्तीमुळे आर्थिक वृद्धी होईल. या लोकांना सुख समृद्धी लाभेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे

Story img Loader