Shani dev Favourite Rashi : शनिदेव कर्मानुसार व्यक्तीला फळ देतो. शनिच्या अशुभ परिणामांपासून प्रत्येक जण सावध राहण्याचा प्रयत्न करतो. कधी शनिच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या दिसून येतात तर कधी शनिच्या चांगल्या प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन राजाप्रमाणे सुखी होऊ शकते. शनिदेवाच्या कृपेने गरीब सुद्धा राजा होऊ शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रात बारा राशी असतात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. स्वामी ग्रहाचा राशीवर प्रभाव असतो. कुंभ आणि मकर राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. या राशींवर शनिदेवाची विशेष कृपा असते. शनिदेवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना अडचणीच्या सामना कमी करावा लागतो. कुंभ आणि मकर राशीच्या लोक नशीबवान असतात. या लोकांना कोणता फायदा होतो, हे आज आपण या दोन राशींविषयी जाणून घेऊ या.
कुंभ
कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनिदेव आहे. स्वामी ग्रह असल्यामुळे या राशीवर शनिदेवाचा खास आशीर्वाद असतो. शनिदेव नेहमी या लोकांच्या पाठीशी असतात. कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव सरळ असतो ज्यामुळे शनिदेव यांच्यावर विशेष कृपा दाखवतात. शनिदेवाला सरळ स्वभावाचे लोक खूप आवडतात. हे लोक नेहमी दुसऱ्यांची मदत करायला नेहमी तयार असतात. शनिदेवाची त्या लोकांना कृपा असते जे लोकं इतरांना मदत करतात. कुंभ राशीचे लोक धनसंपत्तीच्या बाबतीत नशीबवान असतात. शनि देवाच्या आशीर्वादामुळे या लोकांना धन संपत्तीच्या संबंधित समस्यांचा सामना खूप कमी करावा लागतो. त्यांना अनेक गोष्टी सहज मिळतात.
हेही वाचा : १८ वर्षांनंतर मीन राशीत विनाशकारी ‘जडत्व योग’; ‘या’ राशींसाठी ठरेल क्लेशदायक? येऊ शकते आर्थिक संकट
मकर
मकर राशीचा सुद्धा स्वामी ग्रह शनिदेव आहे. या राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. शनिदेवाच्या आशीर्वादामुळे मकर राशीच्या लोकांची आर्थिक बाजू नेहमी मजबूत असते. त्यांना आर्थिक समस्या जाणवत नाही. या राशीचे लोकं नेहमी आनंदी आणि समाधानी आयुष्य जगतात. शनिदेवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांचे दु:ख दूर होतात. हे लोकं खूप नशीबवान असतात. यांच्या चांगल्या स्वभावामुळे शनिदेवाचा या राशीच्या लोकांवर आशीर्वाद दिसून येतो.