Shani Uday 2025 In Meen : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कर्मफळ दाता आणि न्यायाधीश शनीदेवाने २९ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश केला आहे. यानंतर ४ एप्रिल रोजी शनीचा मीन राशीत उदय झाला आहे. मीन राशीत शनीदेवाच्या उदयामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. याशिवाय या राशींना अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशी भाग्यवान आहेत…
मकर
शनीदेवाचा उदय मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. तसेच तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते योग्य असल्याचे सिद्ध होऊ शकतात. नोकरीत पदोन्नतीसह नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. यासह तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. नोकरदारांना बॉस आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळू शकते. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच तुमची मोठ्या लोकांशी चांगली ओळख निर्माण होईल, जी भविष्याच्या दृष्टीने तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.
मिथुन
शनी ग्रहाचा उदय मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. तसेच यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. या काळात तुम्हाल देश-परदेशात प्रवासाची संधी मिळेल, जी तुमच्या करिअरच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल, तसेच आध्यात्मिक विकास आणि गूढ ज्ञानात रस वाढू शकतो. तसेच जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करू शकता. अनेक चांगल्या ओळखी निर्माण होतील.
धनु
शनीदेवाचा उदय धनु राशीसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. या काळात तुमच्या सुखसोयीत वाढ होईल. हा काळ वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी सर्वात शुभ आहे, तुम्ही कोणतीही गुंतवणूक कराल, त्याचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळू शकतो. तसेच नोकरीत पदोन्नतीसह नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम करण्याची शक्यता आहे, या काळात तुमचे आई आणि सासू-सासऱ्यांशी असलेले नाते अधिक घट्ट होईल.