Shani vakri 2023 Zodiac Effects: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या साऱ्या गोष्टी शनी ग्रहावरून ओळखता येतात. शनी जर पत्रिकेत सुस्थितीत असेल तर पैसा, वैवाहिक सौख्य, सुख- समाधान उत्तम प्राप्त होते. त्यामुळे कुंडलीशास्त्रात शनी ग्रहाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. १७ जून २०२३ ला तब्बल सहा महिन्यांनी शनिदेव स्वराशीचा वक्री झाले आहेत. तर आता पुढील १४० दिवस म्हणजेच ३ नोव्हेंबर २०२३ च्या रात्री १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत शनिदे वक्रअवस्थेत राहणार आहेत. असं म्हणतात की शनीची वक्रदृष्टी एखाद्या राशीला अत्यंत त्रासदायक ठरू शकते पण काही राशींच्या बाबत मात्र याबाबत अपवाद घडू शकतो. येत्या १४० दिवसात सुद्धा काही राशी या प्रचंड श्रीमंत होण्याची चिन्हे आहेत तर काहींना मात्र अपार कष्ट सोसावे लागू शकतात. आज आपण शनी वक्री नंतर १२ राशींच्या नशिबाला कशी कलाटणी मिळू शकते हे पाहूया …

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनी वक्री: १२ राशींचे भविष्य

मेष रास (Aries Zodiac Horoscope)

शनी वक्री झाल्यावर आपल्या आर्थिक कमाईत वाढ होण्याची चिन्ह आहेत. समाजातील मान-सन्मान वाढीस लागू शकतो. नोकरदार मंडळींना एखादी मोठी जबाबदारी पेलावी लागू शकते. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

शनीची उलट चाल आपल्यावरील कामाचा ताण वाढवू शकते. ताण व थकवा वाढल्याने चिडचिड होऊ शकते. आपल्या कुंडलीत नव्या वाहन खरेदीचा योग आहे. प्रॉपर्टीवरून वाद सुरु असल्यास त्यावर तोडगा निघू शकतो. कौटुंबिक सुख लाभू शकते.

मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)

शनीच्या प्रभावाने आपल्याला बदल अनुभवता येऊ शकतो. विशेषतः नोकरदार मंडळी व विद्यार्थ्यांना प्रवासाचे योग आहेत. सामाजिक व धार्मिक कामातील सहभाग अनपेक्षित पद्धतीने वाढू शकतो. तुमच्या निर्णयांचे कौतुक होऊ शकते.

कर्क रास (Cancer Zodiac Horoscope)

कामाच्या ठिकाणी तुमची काहीशी निराशा होऊ शकते. तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. भांडणांपासून दूर राहा.

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

शनीचा प्रभाव तुमच्यासाठी नकारात्मक सिद्ध होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद हवा असल्यास तुमच्या वाणीवर खूप नियंत्रण ठेवावे लागू शकते. कोणत्याही प्रकारच्या गॉसिपमध्ये सहभागी होणे टाळावे जेणेकरून तुमचेच मन शांत राहू शकेल. विवाह इच्छुक मंडळींना लग्नासाठी वाट पाहावी लागू शकते.

कन्या रास (Virgo Zodiac Horoscope)

शनिदेव वक्री होणे हे आपल्या राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते. नोकरदार मंडळी व व्यावसायिकांना सुद्धा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभू शकतो. तुम्हाला कर्जासाठी अर्ज करावा लागू शकते पण त्याचे कारण तुमच्यासाठी प्रचंड फायद्याचे ठरू शकते.

तूळ रास (Libra Zodiac Horoscope)

शनी वक्री आपल्याला ऊन- सावलीसारखा प्रभाव दाखवू शकते. आपल्याला कामाच्या ठिकाणी प्रचंड यश लाभू शकते पण प्रेमाच्या बाबत नशीब आपली साथ सोडू शकते. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी तुम्हाला भावुक होणे टाळावे लागू शकते पण विचारपूर्वक निर्णय घ्या.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac Horoscope)

कुंभेचा शनी वृश्चिक राशीला चतुर्थ स्थानात येतो. कौटुंबिक सुखात होणारे मतभेद पंचमातील गुरु व षष्ठातील राहू वाढू देणार नाहीत पण अति हट्टीपणा हेकेखोरपणाला मुरड घालण्यातच आपले हित आहे. स्थावर इस्टेट मालमत्ता शेती वाडीच्या खरेदीविक्रीतून फायदा होऊ शकतो. कोर्टकचेरीच्या निकालात यश लाभू शकते. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

धनु रास (Sagittarius Zodiac Horoscope)

कुंभ राशीचा शनी धनु राशीच्या पराक्रमात (तृतीयस्थानात) जात आहे आणि त्याच बरोबर धनु राशीची साडेसाती संपते ही एक लक्षणीय बाब आहे हा शनी स्वराशीत शुभदायक आला आहे. नोकरी उद्योगधंद्यात नवीन संधी चालून येऊ शकतात. प्रवासाचे योग येतील. आर्थिक बाबतीतली उलाढाल समाधानकारक घडू शकते. जुन्या समस्या संपुष्टात येऊ शकतात

मकर रास (Capricorn Zodiac Horoscope)

अडकलेले धन परत मिळू शकते. योग्य प्रयत्न आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने, मकर राशीचे लोक त्यांच्या व्यवसायात, कामाच्या ठिकाणी आणि राजकीय क्षेत्रात चमकू शकतात. विनाकारण भांडणात अडकू नका.

हे ही वाचा<< लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ‘या’ तीन राशींना मिळेल बक्कळ धनलाभ? तुमची रास कोणत्या रूपात होणार श्रीमंत?

कुंभ रास (Aquarius Zodiac Horoscope)

शनिदेव हा राशीचा स्वामी असल्यामुळे शनिदेवाची कृपा कायम असू शकते. शनी व लक्ष्मी कृपेने आपल्याला येत्या काळात संपत्ती आणि प्रतिष्ठा लाभू शकते. अनियोजित खर्च करणे टाळल्यास आपल्याला बचत रूपात धनलाभ होऊ शकतो. राग नियंत्रणात ठेवा.

मीन रास (Pisces Zodiac Horoscope)

मीन राशीच्या व्ययात शनी त्यामुळे मीन राशीला पहिली साडेसाती चालू होईल पण शनीचे स्वराशीतील भ्रमण फारसे त्रासदायक ठरणार नाही. अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल त्यात होणारी आवक गोठल्याने व त्यातून चिंता वाढू शकते. पैशाची बचत करून पैसे जपून वापरणे हा नियम स्वत:ला लावून घ्या.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani dev vakri for 140 days money will rain on these zodiac signs 12 rashi bhavishya for next three months astrology news svs
Show comments