Shani Dev : ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनिदेवाच्या राशी परीवर्तनामुळे इतर राशींवर परिणाम होत असतो. या वर्षी जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत तब्बल बारा महिने शनिदेव फक्त कुंभ राशीत राहणार आहे. कुंभ राशी शनिदेवाची प्रिय रास मानली जाते. त्यामुळे याचा फायदा इतर राशींना होऊ शकतो. ज्योतिषशास्त्राप्रमाणे, शनिदेव कुंभ राशीत असल्यामुळे याचा फायदा राशीचक्रातील चार राशींना होणार आहे. या राशींच्या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे फळ मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. धनसंपत्तीत वाढ होईल. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. त्या चार राशी कोणत्या आहेत, चला तर जाणून घेऊ या.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना या वर्षी भरपूर आत्मविश्वास मिळेल. त्यांना कमावण्याच्या अनेक संधी समोर येतील. वर्षभर यांना मित्रांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे संकटाच्या वेळी ते खंबीर राहतील. याबरोबरच या वर्षी प्रवासाचे योग दिसून येईल.घरी धार्मिक कार्य होऊ शकतात. जोडीदाराबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवाल. आर्थित स्थिती मजबूत राहील. नवीन कार्य सुरू करण्याचा विचार करू शकता.

shash and malavya rajyog will make after holi these zodiac sign could be lucky
शश आणि मालव्य राजयोगामुळे या ३ राशींचा सुरू होईल सुर्वणकाळ; शनी-शुक्र देवाच्या कृपेने होळीच्या आधी पूर्ण होतील सर्व कामे
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mahakumbh 2025
आज महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान! बुधादित्य योगामुळे ‘या’ ३ राशींचा होईल भाग्योदय, करिअर -व्यवसायात मिळेल भरपूर यश
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
venus and sun yuti 2025
शुक्रादित्य राजयोग देणार पैसाच पैसा; १२ महिन्यानंतर निर्माण झालेल्या राजयोगाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार
Daily Astrology in Marathi
३१ जानेवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटच्या दिवशी१२ पैकी ‘या’ राशींच्या नशिबी आनंदासह धनलाभाचेही संकेत; तुम्हाला कोणत्या मार्गे मिळेल सुख?

वृषभ राशी

या राशीच्या लोकांमध्ये भरपूर आत्मविश्वास दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी काम वाढेल आणि पदोन्नतीची शक्यता वाढू शकते. व्यवसाय वाढू शकतो. वर्षभर वडिलांची साथ मिळेल. धन प्राप्तीचे योग दिसून येत आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. नवीन काम सुरू करू शकता.

हेही वाचा : Mangal Gochar : आजपासून या राशींचे बदलणार नशीब, होणार अचानक धनलाभ; वाचा, तुमची रास यात आहे का?

मिथुन राशी

या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास खूप जास्त दिसून येईल.त्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रगती दिसून येईल.व्यवसायात वाढ होईल. कुटूंबात धार्मिक कार्य घडू शकते. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष उत्तम असेल.कुटूंबातील लोकांचे सहकार्य लाभेल.शिक्षण घेणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष भाग्याचे ठरू शकते. प्रत्येक ठिकाणी लाभ मिळू शकतो.

सिंह राशी

या राशीच्या लोकांच्या घरी धार्मिक कार्य होऊ शकते. मित्राच्या मदतीने आर्थिक वृद्धी होईल. आरोग्याच्या समस्या दूर होतील. मानसिक सुख शांती लाभेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम राहाल. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी लाभेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader