Shani Vakri 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो किंवा युती बनवतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. शनिदेवाने आपली राशी बदलून १२ जुलैला मकर राशीत प्रवेश केला आहे आणि ५ जून पासून प्रतिगामी स्थितीत आहे. सुमारे अडीच वर्षात शनि राशीत बदल होतो. शनिदेवाची राशी पूर्ण होण्यास सुमारे ३० वर्षे लागतात. ऑक्टोबर महिन्यापर्यंत शनि या मकर राशीत राहील. तर ऑक्टोबर पर्यंत अशा चार राशी आहेत ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे. तर जाणून घ्या या चार राशींबद्दल ज्यांच्यावर शनीच्या आगमनाचा शुभ प्रभाव होईल.

वृषभ

शनीचे प्रतिगामी संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. करिअरच्या प्रगतीमुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ अनुकूल राहील. शनिदेवाच्या कृपेने रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील. या काळात धनलाभ होण्याची देखील संभावना आहे.

( हे ही वाचा: Shravan 2022: श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी उघडणार ‘या’ तीन राशींचे भाग्य; शनिदेवाची असेल विशेष कृपा)

धनु

केवळ प्रतिगामी शनि धनु राशीच्या लोकांना लाभ देईल. या काळात तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा देईल. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यापार्‍यांसाठी काळ अनुकूल राहील. पैशांची कमतरता ऑक्टोबरपर्यंत भासणार नाही.

मीन

राशीच्या लोकांसाठी प्रतिगामी शनि लाभदायक सिद्ध होऊ शकतो. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होऊ शकते. व्यवसायिकांना भागीदारीच्या कामात फायदा होईल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. धनलाभ होऊ शकतो.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader