Name starts with S Personality: ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मवेळेनुसार त्यांची रास व राशीवरून नामकरणाचा काही आद्याक्षरे सुचवली जातात. यातील प्रत्येक अक्षराचा एका मूलांक असतो व त्यानुसार त्यांच्यावर स्वामित्व असणाऱ्या ग्रहांचा अंदाज घेता येतो. S या अक्षराचा मूलांक हा ६ किंवा ८ असा असतो व व्यक्तींवर शनीचा प्रभाव असल्याचे मानले जाते. शनीच्या प्रभावामुळे ही मंडळी भावनिक असूनही इतरांसमोर वावरताना आपला तटस्थ चेहराच दाखवतात. असं असुनही या लोकांचा स्वभाव प्रेमळ, पटकन कुणाशीही मैत्री करणारा आणि बोलका असतो. S अक्षराच्या नावाच्या व्यक्तींचा स्वभाव आणखी सखोल स्वरूपात जाणून घेऊया..

प्रेम व कुटुंब

ज्यांचे नाव S ने सुरू होते ते लोक उत्कट प्रेम करणारे आणि रोमँटिक स्वभावाचे असतात. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यात आनंद मिळतो आणि ते सहसा त्यांच्या जोडीदारांकडूनही तशीच अपेक्षा करतात. त्यांना सतत ऍक्टिव्ह जीवनशैली जगण्याची आवड असते त्यामुळे काही वेळा निराशा झाल्यास त्यांना या अपेक्षांचा त्रास होऊ शकतो. ही मंडळी निष्ठा आणि वचनबद्धतेसाठी देखील ओळखली जातात आणि ते त्यांच्या नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि मुक्त संवादाला महत्त्व देतात.

people born on these date can become a good leader
‘या’ तारखेला जन्मलेले लोक बनतात चांगले राजकीय नेते, राजकारणात कमवतात नाव
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : हीच ‘सप्रेम इच्छा’अनेकांची!
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
IFS, UPSC, girl opt IFS, IAS IPS, Vidushi Singh,
आयएएस, आयपीएसचा पर्याय सोडून आजीआजोबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयएफएसची निवड
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव
Loksatta kutuhal Fear of misuse of artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराची भीती

करिअर व धनलाभ

करिअरच्या बाबतीत, ज्यांचे नाव S ने सुरू होते ते लोक महत्त्वाकांक्षी आणि मेहनती असतात. ते सहसा सर्जनशील किंवा कलात्मक क्षेत्राकडे आकर्षित होतात आणि त्यांच्यात स्वतःला व्यक्त करण्याचे कौशल्य असते. याच मार्गातून त्यांना प्रचंड धनप्राप्तीचा सुद्धा योग असतो.

नकारात्मक गुण

ज्या लोकांचे नाव S ने सुरू होते त्यांच्यात काही नकारात्मक गुण देखील असू शकतात. उदाहरणार्थ, ते कधीकधी हट्टी आणि बदलासाठी नकारात्मक असू शकतात. परिणामांचा पूर्णपणे विचार न करता निर्णय घेण्याची प्रवृत्ती त्यांच्यात असू शकते.

(टीप: वरील लेख हा निरीक्षण व प्राप्त माहितीवर आधारित आहे)