ज्योतिषशास्त्रानुसार शनि प्रभावामुळे मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो. कुंडलीत शनिची स्थिती व्यवस्थित नसल्यास त्रास जाणवतो. शनि महादशा, शनि अंतर्दशा, शनि साडेसाती, शनि अडीचकी या काळात प्रभाव दिसून येतो. त्यामुळे शनि आपल्या राशीला येणार म्हटलं की घाम फुटतो. तर काही जणांना शनि आपल्या राशीतून जाणार म्हटलं की दिलासा वाटतो. शनि ग्रह अडीच वर्षांनी राशी बदलतो. नऊ ग्रहांपैकी शनि हा सर्वात मंद चाल असलेला ग्रह आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला खूप महत्त्व आहे. हिंदू ज्योतिषशास्त्रात शनि हा ग्रह वय, दुःख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, खनिज तेल, कर्मचारी, नोकर, तुरुंग इत्यादींचा कारक मानला जातो. हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. तसेच, तूळ रास ही शनीची उच्च राशी आहे. मेष ही नीच राशी मानली जाते. शनिचे संक्रमण अडीच वर्षे एकाच राशीत राहते. त्यामुळे शनिच्या प्रभावाखाली असलेल्या राशींना अडीच वर्षानंतर दिलासा मिळतो. सध्या मिथून आणि तूळ राशी शनि अडीचकीच्या प्रभावाखाली आहेत. २९ एप्रिलला शनिने कुंभ राशीत प्रवेश करताच या दोन राशींची शनि अडीचकीपासून सुटका होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. त्यामुळे सुमारे ३० वर्षांनी शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाधीशाचा दर्जा आहे. म्हणजे शनि ग्रह कर्मानुसार फळ देतो. शनि ज्या राशीत प्रवेश करतो त्या राशीसह मागच्या पुढच्या राशीला साडेसाती सुरु असते. आता शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा तर मीन राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. तर धनु राशीचा साडेसातीपासून सुटका होणार आहे. तर तूळ आणि मिथून राशीला शनिची अडीचकी सुरु आहे. त्यांनाही २९ एप्रिलनंतर दिलासा मिळणार आहे.

Budh Gochar: धनदात्या शुक्राच्या राशीत बुध करणार प्रवेश, तीन राशींसाठी ‘अच्छे दिन’

धनु राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. मात्र १२ जुलै २०२२ रोजी शनि मकर राशीत वक्री होणार असल्याने पुन्हा तिन्ही राशी शनिच्या अधिपत्याखाली येतील. ही स्थिती १७ जानेवारी २०२३ पर्यंत राहील. मिथुन, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना १७ जानेवारी २०२३ रोजी शनिपासून खऱ्या अर्थाने मुक्ती मिळेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani enter in kumbh rashi after 7 days rmt