Saturn Transit In Kumbh Rashi: शनी हा एक संथगतीने चालणारा ग्रह आहे. बारा राशींचा प्रवास पूर्ण करण्यास त्याला अंदाजे २९ वर्ष ६ महिने लागतात. तर शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा काल अडीच वर्षाचा असतो. विशेषत: शनी ज्या चंद्रराशीत असतो ती रास व त्याच्या पुढील व मागील राशीला साडेसाती असते. उदा. चंद्र राशी कन्या आहे तर सिंह, तूळ व कन्या या तिन्ही राशींना एकाच वेळी साडेसाती सुरू असते. साडेसातीचा एकूण काळ साडेसात वर्षे असतो. राशी परत्वे या साडेसातीच्या काळात काही काळ खूप क्लेशदायक जातो.यावर्षी १७ जानेवारी २०२३ रोजी शनी मकर राशीतून वायुतत्वाच्या बौद्धीक कुंभ राशीत प्रवेश करीत आहे. त्यामुळे काही राशीना एक वेगळी उर्जा प्राप्त होईल.
कोणत्याही ग्रहांची शुभ – अशुभ फळे पाहताना लग्न राशीला प्रथम प्राधान्य द्यावे. कारण जन्मराशी ही जन्मवेळेवरून काढतात. तर चंद्रराशी चंद्र ज्या राशीत स्थिर आहे ती रास मानतात. तेव्हा लग्न राशी व चंद्र राशी यांचा अभ्यास करून निष्कर्ष ठरवावेत. शनी बदलानंतर खालील तीन राशींना शनीच्या साडेसातीतून मुक्ती मिळणार आहे.
१७ जानेवारीला ‘या’ राशी होणार मुक्त
मिथून (Gemini Zodiac)
आपल्या नवम स्थानात कुंभेचा शनी आपल्या भाग्य स्थानात आहे. हा शनीमुळे उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या विचारांचे व सल्ल्याचे स्वागत होईल. धर्मादाय कामात सार्वजनिक कामात आपला सहभाग मोलाचा ठरेल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. वर्षभर कार्यमग्न रहाल. राजकारणात वा सामाजिक कामात कायद्याची कक्षा जरुर पाळावी. शारिरीक ताकदीपेक्षामनाचे बळ खूप मोठे असते. अशावेळी आपली खरी मानसिकता आपल्या जिभेवर घोळत असते. त्यामुळे विचारपूर्वक बोलणे हिताचे ठरेल.
हे ही वाचा<< Leo Yearly Horoscope 2023: सिंह रास श्रीमंत कधी होणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचं राशीभविष्य
तूळ (Libra Zodiac)
या राशीला शनी पाचवा येत आहे. तूळ- कुंभ या दोन्ही वायूंनी बौद्धीक राशी त्यामुळे विज्ञानशाखेच्या लोकांना या वर्षात उत्तम संधी प्राप्त होतील. नवे संशोधन नवे विचार पुढे येतील. प्रगतीशील कामे होतील. समाजकार्यांत, राजकारणात संधी प्राप्त होतील. शेअर्स, म्युच्युअल फंड यात केलेली गुंतवणूक फायदेशील ठरेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणात विशेष प्रगती दिसून येईल. २१ एप्रिल रोजी मेष राशीत येणारा गुरू शनीशी शुभयोग करील यातूनच उत्तम कल्पना सुचतील त्या साकार करण्यासाठी पूर्ण वर्षातील काळाचा सद्पयोग करावा.
हे ही वाचा<< १७ जानेवारीपासून १२ राशींच्या तन, मन, धनावर शनीचे राज्य! कोण होणार श्रीमंत? कोणाची साडेसाती संपणार?
धनु (Sagittarius Zodiac)
कुंभ राशीचा शनी धनु राशीच्या पराक्रमात (तृतीयस्थानात) जात आहे आणि त्याच बरोबर धनु राशीची साडेसाती संपते ही एक लक्षणीय बाब आहे हा शनी स्वराशीत शुभदायक आला आहे. त्यामुळे नोकरी उद्योगधंद्यात नवीन संधी चालून येतील. प्रवासाचे योग येतील. आर्थिक बाबतीतली उलाढाल समाधानकारक घडेल. जुन्या समस्या संपुष्टात येतील. एकूण खूप दिवसांनी आलेला हा सुखद काळ आनंद देईल. पण मात्र या सर्वात कुठेही भावनेचा अतिरेक टाळा. भरवसा अतिविश्वास ठेवू नका. स्वत: सक्रीय रहा. व स्वत:वर नियंत्रण ठेवा.