ज्योतिषशास्त्रानुसार ठराविक कालावधीनंतर ग्रह राशी बदलत असतात. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी रास बदलतो, तर शनि अडीच वर्षानंतर राशी बदल करतात. त्यामुळे गोचर कालावधीत काही ग्रह एकाच राशीच एकत्र येतात तेव्हा काही योग तयार होतात. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रात शनि हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनिदेवाचे वर्णन कर्मदाता आणि वय प्रदान करणारे म्हणून केले गेले आहे. सध्या शनि मकर राशीत भ्रमण करत आहे. २९ एप्रिल २०२२ रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मकर आणि कुंभ या राशींना त्यांची स्वतःची राशी मानली जाते. कारण या राशींचा शासक ग्रह शनि आहे. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे असतात. शनिदेव केलेल्या कर्माचे फळ देतात, अशी मान्यता आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कोणतीही राशी बदलली की त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. २०२२ मध्ये अनेक ग्रह राशी बदलणार आहेत. ३० वर्षांनंतर शनिदेवही कुंभ राशीत प्रवेश करतील. चला जाणून घेऊयात कोणत्या राशीच्या लोकांना शनिच्या संक्रमणामुळे फायदा होणार आहे.

Solar Eclipse 2022: भरणी नक्षत्रात लागणार या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण, जाणून घ्या कधी आणि कुठे दिसेल

ज्योतिषांच्या मते शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. शनि हा अतिशय संथ ग्रह असल्याने. सध्या धनु, मकर आणि कुंभ राशीवर शनि साडेसाती सुरू आहे. मिथुन आणि तूळ राशीवर शनीची अडीचकी सुरु आहे. ज्योतिषांच्या मते, शनिच्या अडीचकीत प्रभाव असलेल्या लोकांना कामात यश मिळविण्यासाठी आव्हानांना सामोरे जावं लागते. शनिचा कुंभ राशीत प्रवेश होताच मिथुन, तूळ आणि धनु राशीच्या लोकांची प्रभावातून सुटका होईल.धनु राशीच्या लोकांना शनि साडेसातीपासून मुक्ती मिळेल, तर मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनि अडीचकीपासून मुक्ती मिळेल. या काळात धनु राशीच्या लोकांना पूर्ण मुक्ती मिळणार नाही. धनु राशीच्या लोकांना २०२३ मध्येच शनि साडेसातीपासून मुक्ती मिळेल. कारण १२ जुलै ते १७ जानेवारी २०२३ पर्यंत शनि मकर राशीत भ्रमण करणार आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani gochar 2022 in kumbh rashi rmt
Show comments