वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. २०२२मध्ये अनेक ग्रह राशी बदलतील. न्यायदेवता शनिदेव देखील राशी बदलणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून ही स्थिती महत्त्वाची असणार आहे. २९ एप्रिल रोजी शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करतील. शनीचे संक्रमण: कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या या संक्रमणाचा सर्वाधिक प्रभाव पडेल. याशिवाय मकर, मीन, कर्क आणि वृश्चिक राशींवरही शनीच्या या संक्रमणाचा परिणाम होईल. जाणून घ्या शनीच्या राशी बदलाचा या राशींवर काय परिणाम होईल.
कुंभ राशीच्या लोकांचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात, हा टप्पा सर्वात त्रासदायक मानला जातो. कारण या काळात शनि साडेसातीचा प्रभाव त्याच्या शिखरावर असतो. या काळात व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या अवस्थेत शनि जर एखाद्या व्यक्तीच्या उदर भावात असेल तर पोट, हृदय, किडनीशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात तुमची एखाद्या नातेवाईकांकडून किंवा मित्राकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. व्यवसायातही कठोर परिश्रम घ्यावे लागतात. अपघातात जखमी होण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक नुकसान होऊ शकते. या काळात अनेक संकट येतात. असं असलं तरी साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात शनिदेव व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या मजबूत करतात. मात्र कुंडलीत शनिदेव कोणत्या स्थानात आहेत यावर अवलंबून असतं.
८ जानेवारी २०२२ रोजी शनिदेवांना प्रसन्न करण्याचा योग, चुकूनही या गोष्टी करू नका
शनि गोचरचा प्रभाव मकर आणि मीन राशीच्या लोकांवरही होईल. मकर राशीच्या लोकांच्या शनि साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल. तर मीन राशीच्या लोकांसाठी पहिला टप्पा सुरु होईल. तर धनु राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तर कर्क आणि वृश्चिक राशीचे लोक शनी ढय्याखाली येतील. तर मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांची ढय्येतून मुक्तता होईल.