Shani nakshatra gochar 2024: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून, २८ मार्च २०२५ पर्यंत शनी याच राशीत असेल. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करील. दरम्यान, तोपर्यंत हा १०३ दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल.

तीन राशीच्या व्यक्तींना शनी करणार मालामाल

मेष

Gajkesri rajyog 2025 guru Chandra Gochar 2025
GajKesri Rajyog 2025 : नवीन वर्षात गजकेसरी राजयोगाने ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? गुरु-चंद्र संयोगाने मिळणार प्रचंड धनलाभाची संधी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shani will create Shash Raj
धनत्रयोदशीच्या शुभ मुहर्तावर तब्बल ३० वर्षानंतर शनी निर्माण करणार शश राजयोग; ‘या’ ३ राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य, मिळणार धनसंपत्तीचे सुख
Daily Horoscope 16 December 2024
१६ डिसेंबर पंचांग: प्रतिपदा तिथी १२ राशींच्या आयुष्यासाठी ठरेल शुभ! विवाहयोग ते धनलाभ, तुमच्या नशिबात आज काय?
Numerology New Year 2025
Numerology New Year 2025 : तुमची जन्म तारीख १, १०, १९ किंवा २८ आहे? जाणून घ्या कसे असणार तुमचे नवीन वर्ष?
shani dev margi 2024 today horoscope
१५ नोव्हेंबरनंतर शनिदेव ‘या’ राशींवर करणार धन अन् सुखाची बरसात; शनी मार्गी होताच मिळेल बक्कळ पैसा अन् यश
January 2025 astrology
२०२५ मध्ये पहिल्या महिन्यात ‘या’ तीन राशींचे उघडणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन संपत्ती
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

कुंभ राशीतील शनी मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढील १०३ दिवस शुभ परिणाम घडवून आणेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

सिंह

कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाल तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. १०३ दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मात्र, प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे.

हेही वाचा: तब्बल १२ वर्षानंतर मीन राशीत निर्माण होणार ‘लक्ष्मी नारायण योग’; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस

तूळ

शनीची कुंभ राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. हा १०३ दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader