Shani Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. असे म्हटले जाते की, जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात, अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते. ज्योतिषशास्त्रात शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यामुळे तो एका राशीत जवळपास अडीच वर्ष राहतो त्यामुळे त्याला १२ राशींचे राशीचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला तब्बल ३० वर्षांचा कलावधी लागतो. त्यामुळे शनीच्या महादशेचा आणि साडेसातीचा प्रभाव लोकांवर पडतो. सध्या शनी कुंभ राशीत असून शश राजयोग निर्माण करत आहे. २०२५ पर्यंत हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीत ‘या’ तीन राशींची होणार चांदी

मिथुन

शश राजयोग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक नवीन बदल पाहायला मिळतील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत मानसन्मान प्राप्त होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. कर्ज फेडण्यास मदत होईल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मान-सन्मान वाढ होईल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

कन्या

शश राजयोग कन्या राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर असेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आयुष्यात आलेल्या अडचणी दूर होईल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल. आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचला. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात आकस्मिक धनलाभ होतील. जोडीदाराचा सहयोग प्राप्त होईल.

हेही वाचा: दिवाळी घेऊन येणार सुखाचे दिवस; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिन्यात मिळणार भरपूर पैसा, प्रेम अन् मानसन्मान

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शश राजयोग खूप शुभ फळ देणारे ठरेल. स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्यांना यशाचे गोड फळ लाभेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani gochar 24 on the auspicious occasion of dhantrayodashi shani will create shash raj yoga the people of these 3 zodiac signs will earn money sap