Shash Rajyog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात नवग्रहांमध्ये शनी हा महत्वाचा ग्रह मानला जातो. शनिदेव हे अत्यंत संथगतीने मार्गक्रमण करतात. त्यामुळे एका राशीत स्थिर झाल्यावर त्यांचा प्रभाव अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत एक राशी चक्र पूर्ण करण्यासाठी शनिदेवाला ३० वर्षे लागतात. पण शनीदेवाचा परिणाम १२ राशींवर होत असतो.

शनि सध्या त्याच्या मूळ कुंभ राशीत आहे. अशा स्थितीत शनि पंचमहापुरुषांपैकी एक शश राजयोग निर्माण करत आहे. शनीच्या या शक्तिशाली राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. २९ मार्च २०२५ रोजी शनि कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. यामुळे हा दुर्मिळ राजयोग समाप्त होईल. कुंभ राशीतून शनीचे दुसऱ्य राशीतील परिवर्तन केवळ काही राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकते.अशावेळी शनीच्या शश राजयोगामुळे कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो, जाणून घेऊ…

Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Sun-Saturn conjunction in 2025
२०२५ मध्ये सूर्य-शनीची युती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक क्षेत्रात यश
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १० दिवसानंतर पालटणार तीन राशींचे नशीब, सूर्य देवाच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन

वृषभ राशी

शनीचा शश राजयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकतो. त्याच्या जीवनात आनंदाचे, सुखाचे दिवस येऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. मालमत्ता, घर आणि वाहन खरेदीसाठी हा एक सुखद काळ आहे. करिअरच्या क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. भविष्यात तुम्हाला यातून भरपूर लाभ मिळू शकतात. तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.

तुळ राशी

शनीचा शश राजयोग तुळ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळून देऊ शकतो. यामुळे समाजात तुमच्या प्रती आदर, सन्मान वाढू शकतो. पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच, जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मार्च २०२५ पर्यंत तसे करू शकता. अशा परिस्थितीत पगार वाढण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ खूप चांगला जाणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल.

धनु राशी

शनीच्या शश राजयोगामुळे धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात थोडा संघर्ष असेल. पण शेवटी यश नक्की मिळवू शकता. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या शनिच्या अस्ताने सोडवता येऊ शकतात. या काळात तुमचे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात.यामुळे लग्न कार्यात येणारे अडथळे आता दूर होऊ शकतात.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी शशा राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात मकर राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. परदेश प्रवास करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुमची आर्थिक परिस्थिती सुधारु शकते. जे लोक त्यांच्या वैवाहिक जीवनातील अडथळे किंवा समस्या आता संपू शकतात. यामुळे कुटुंबासह तुम्ही सुख, समाधान आणि आनंदाचे जीवन जगू शकता.

Story img Loader